मालदीवच्या अध्यक्षांची दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट

मालदीव प्रजासत्ताकचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांच्यासह शिष्टमंडळाने गोरेगाव येथील महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे आज भेट दिली. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार यांनी त्यांचे स्वागत केले.

    मुंबई : मालदीव प्रजासत्ताकचे (Maldive Republic) अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह (Ibrahim Mohamed Solih) यांच्यासह शिष्टमंडळाने गोरेगाव येथील महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी (Dadasaheb Phalke Chitranagari) येथे आज भेट दिली. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार (Vivek Bhimanwar) यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान चित्रनगरीमधील बॉलिवूड पार्क, क्रोमा स्टुडिओ पाहून उपस्थित शिष्टमंडळ प्रभावित झाले.

    मालदीवच्या अध्यक्षांसह शिष्टमंडळात मालदीवचे वित्तमंत्री इब्राहिम अमीर, आर्थिक विकास मंत्री फैय्याज इस्माईल, भारताचे उच्चायुक्त मुनू महावार यांचा समावेश होता. बॉलिवूड पार्कमध्ये मराठी, हिंदी आणि मालदीव भाषेतील नृत्याबरोबर कॉमेडी शो आयोजित करण्यात आला होता. क्रोमा स्टुडिओमध्ये चित्रीकरणापूर्वी आणि नंतर कसे बदल, इफेक्ट्स केले जातात याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या शिष्टमंडळाने ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेच्या सेटला भेट दिली.

    मालदीवमध्ये पर्यटन आणि उद्योगाच्या संधी बरोबरच चित्रीकरणासाठी आवश्यक असणारी अनेक स्थळे असून ती भारतीय निर्मात्यांच्या पसंतीचे चित्रीकरण स्थळ असल्याचे भीमनवार यांनी सांगितले. यावेळी महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे यांसह विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.