अनुपम खेर आणि विवेक अग्निहोत्री यांची जोडी पुन्हा करणार धमाल! ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात

अनुपम खेर यांची विवेक अग्निहोत्रीसोबत काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. दोघांनी यापूर्वी 'द काश्मीर फाइल्स'मध्ये एकत्र काम केले होते.

    नवीन वर्षात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे पुन्हा एका सामाजिक विषयावर असलेल्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षाकांच्या भेटीस येणार आहे. काश्मीर फाईल्स चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

    अनुपम खेर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकांऊटवर चित्रपटाचा क्लॅपबोर्ड हातात धरलेला एक फोटो शेअर केला आहे. त्याने कॅप्शन म्हणून लिहिले: “माझ्या ५३४व्या चित्रपटाची घोषणा करत आहे!!! @vivekagnihotri द्वारा दिग्दर्शित #TheVaccineWar आकर्षक आणि प्रेरणादायी! जय हिंद.”

    अनुपम खेर यांची अग्निहोत्रीसोबत काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. दोघांनी यापूर्वी ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये एकत्र काम केले होते.  सत्य घटनांवर आधारित आणि समाजातील  अत्यंत महत्त्वाच्या लोकांवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांना ओळखलं जातं. या चित्रपटाची निर्मीती पल्लवी जोशी यांनी केली आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ हे भारतीय शास्त्रज्ञ आणि कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान लस विकसित करण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ आपल्या रात्रंदिवस बलिदान देणाऱ्या लोकांबद्दलची कथा सादर करते.