वेब सिरीज ‘क्रिमिनल जस्टिस 3’ चा टीझर रिलीज, पंकज त्रिपाठी कोर्टात नवीन केस सोडवताना…

बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीच्या बहुप्रतिक्षित वेब सीरिज 'क्रिमिनल जस्टिस'च्या तिसऱ्या सीझनचा टीझर आज रिलीज झाला आहे.

    बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीच्या बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘क्रिमिनल जस्टिस’च्या तिसऱ्या सीझनचा टीझर आज रिलीज झाला आहे. चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते आणि आज त्यांची प्रतीक्षा संपली आहे. या सीझनमध्येही हा अभिनेता वकिलाच्या भूमिकेत एक नवीन केस सोडवताना दिसत आहे. तो वकील माधव मिश्राच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर अभिनेत्री श्वेता बसू प्रसादही वकिलाच्या भूमिकेत आहे. टीझरमध्ये अवंतिका नावाची महिला पंकज त्रिपाठी यांच्याकडे मदत मागताना दिसत आहे. त्याचबरोबर कोर्टरूमची झलकही टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. रोहन सिप्पी दिग्दर्शित ‘क्रिमिनल जस्टिस 3’ ही वेब सिरीज डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.