‘डेटवर गेल्यानंतर मुलीनं बिल देणं म्हणजे मुर्खपणा’, जया बच्चन पुन्हा बोलल्या!

    नेहमी रोखठोक बोलण्यावरुन आणि पापाराझींवर ओरडण्यावरुन अभिनेत्री जया बच्चन ट्रोल होत असतात. त्या सतत काही ना काही कारणावरुन चर्चेत येतात. सध्या त्यांची नात नव्या नवेली नंदाच्या ‘व्हॉट द हेल नव्या 2’ या पॉडकास्टमुळे चर्चेत त्या चर्चेत आल्या आहेत. या कार्यक्रमात त्यांनी डेटवर जाणाऱ्या मुलींवर वक्तव्य केलं आहे, जे चांगलच व्हायरल झालं आहे. बघा यावेळी नेमकं काय म्हणाल्या जया बच्चन.

    काय म्हणाल्या जया बच्चन

    नव्याच्या पॅाडकास्टमध्ये आई श्वेता बच्चन, भाऊ अगस्त्य नंदा आणि आजी जया बच्चन सहभागी झाले होते.  त्यांनी पुरुषांबाबत  चर्चा केली.  जेव्हा नव्याने महिलांना स्वतंत्र वाटत असल्याचा आणि बिल भरतातात,  असा विषय उपस्थित केला तेव्हा जया ते मूर्खपणाचं असल्याचं त्यांनी म्हण्टलं. त्याचं हे वक्तव्य चांगलच चर्चेत आहे.

    अगस्त्य नंदांचं वेगळं मतं

    जया बच्चन पुढे म्हणाल्या, ‘त्या महिला अशा मूर्ख असतात. तुम्ही पुरुषांना पैसे देऊ द्या.’  मात्र या विषयावर अगस्त्य नंदांचा थोडा वेगळा आहे. तो म्हणाला, ‘जर तुम्हाला असे म्हणायचे असेल की मला या जेवणाचे पैसे द्यायला आवडतील तर त्यात काहीही चुकीचे नाही कारण तुम्ही हे काहीतरी चांगले करण्यासाठी करत आहात. मी मुलगा आहे म्हणून पैसे देईन असे नाही.