‘माझं ऐका, विवाहीत पुरूषांच्या प्रेमात पडू नका कारण…’, अभिनेत्री नीना गुप्ता यांनी दिला सल्ला, VIDEO व्हायरल!

व्हिवियनसोबत नीना यांचं नातं बरंच चर्चेत राहिलं. १९८९ साली नीना यांनी लग्न न करताच मुलगी मसाबाला जन्म दिला. नीना यांनी दीर्घकाळ एकट्यानेच मुलीचं पालनपोषण केलं. २००८ साली व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या विवेक मेहरासोबत त्यांनी लग्न  केलं.

  आपल्या अभिनयनाने अनेक दशकं रसिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे नीनी गुप्ता.  बॉलिवूडमधील सर्वाधिक प्रगल्भ आणि अनुभवी कलावंतांपैकी एक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नीना यांचं वैयक्तिक आयुष्य संकोच न बाळगता अतिशय खुलेपणानं आपल्या भावना आणि मतं मांडत असतात. आता असाच एक मनोगत मांडणारा नीना यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नीना समजावत आहेत, की विवाहित व्यक्तीच्या प्रेमात पडणं का योग्य नाही. त्या म्हणत आहेत, ‘खरं सांगायचं तर काही असे डायलॉग्ज आहेत जे मी तुम्हाला ऐकवणार आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

  तुमच्या इच्छा आणि अपेक्षा वाढू लागतात. तुम्ही लग्नाची गोष्ट करता तेव्हा इथं चर्चा अडकते कारण त्याचं तर आधीच लग्न झालेलं असतं. त्यानं पत्नीपासून घटस्फोट घेणं, संपत्ती आणि बँक अकाउंट्स या सगळ्यांमुळे गोष्टी खूप गुंतागुंतीच्या झालेल्या असतात. शेवटी लग्नाचा प्लॅन रद्द होतो आणि शेवट वेदनादायी होतो. माझ्या अनुभवानुसार सांगायचं, तर सगळ्याच मुलींना मी सल्ला देईन की विवाहित व्यक्तीवर प्रेम करू नका.

  View this post on Instagram

  A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

  या व्हिडीओमध्ये त्यांनी मुलींना विवाहित पुरुषाच्या प्रेमात न गुंतण्याचा सल्ला दिला आहे. नीना यांनी या व्हिडीओमध्ये आपले वैयक्तिक अनुभवही शेअर केले आहेत. नीना या एकेकाळी साऊथ आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू व्हिवियन रिचर्ड्ससोबत नात्यात होती. रिचर्ड्स हे आधीपासून विवाहित होते.