लतादिदींनी कधी लग्न का नाही केलं? चाहत्यांना आजही पडतो प्रश्न

28 सप्टेंबर 1929 रोजी जन्मलेल्या लता मंगेशकर यांनी तरुण वयातच संगीताच्या जगात प्रवेश केला. त्यांनी विविध भाषांमध्ये सहा हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

    संगीतविश्वातील तेजस्वी तारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर ( Lata Mangeshkar Birth Anniversay) यांची आज जयंती. ६ फेब्रवारी २०२२ ला त्यांनी या संगीतविश्वातून निरोप घेतला. आज त्या आपल्यात नाहीत पण त्यांनी आपल्या सुमधुर गाण्यांमधून स्वतःला लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. लता दिदी अविवाहीत होत्या. पण त्यांच्य लग्न न करण्यामागे काय कारण होतं हे फार कमी लोकांना माहित आहे. या मागचं रहस्य काय होतं जाणून घेऊया.

    28 सप्टेंबर 1929 रोजी जन्मलेल्या लता मंगेशकर यांनी तरुण वयातच संगीताच्या जगात प्रवेश केला. त्यांनी विविध भाषांमध्ये सहा हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, त्या अतिशय साधपणानं राहायला आवडतं होतं आणि त्यांनी कधी लग्नही केलं नाही. या कारणामुळे लोकांच्या मनात अनेकदा प्रश्न पडतो की त्यांनी लग्न का केले नाही? त्या कधी प्रेमात पडल्या नाहीत का?

    मात्र असं म्हणण्यात येतं की, लता मंगेशकर डुंगरपूर राजघराण्याचे महाराजा राज सिंह यांच्यावर खूप प्रेम करत होत्या आणि राज सिंह यांनाही लतादीदी आवडत होत्या. त्याचं ए एकमेकांवर प्रेम होतं. राज सिंह हे लतादीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांचेही मित्र होते. लता आणि राज यांची भेट हृदयनाथ मंगेशकर यांच्या माध्यमातूनच झाली. असं म्हटलं जातं की, राज सिंह यांनी आपल्या आई-वडिलांना वचन दिलं होतं की, ते कोणत्याही सामान्य घरातील मुलीला त्यांच्या घरातील सून बनवणार नाहीत.

    लहान वयातच उचलली घरची जबाबदारी

    लता मंगेशकर यांच्याशी लग्न न करण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे घरच्या जबाबदाऱ्या, ज्या त्यांनी लहान वयातच उचलल्या. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचं निधन झालं तेव्हा त्या केवळ 13 वर्षांच्या होत्या, त्यानंतर लतादीदींनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली. त्यामुळेच त्यांनी लग्न केलं नाही. दुसरीकडे, लतादीदींप्रमाणेच राज सिंहही आयुष्यभर अविवाहित राहिले. राज लतापेक्षा ६ वर्षांनी मोठा होते आणि ते त्यांना मिठ्ठू नावानं हाक मारतं.  त्यांच्या खिशात नेहमी लतादीदींची निवडक गाणी असलेले टेपरेकॉर्डर असायचे यावरुन राज यांचं लता मंगेशकर यांच्यावर किती प्रेम होतं, याचा अंदाज लावला येतो.

    लतादीदींची संगीत कारकीर्द

    लता मंगेशकर यांनी बालकलाकार म्हणून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवलं. हे फार लोकांना माहीत नाही. ‘माझं बाळ’, ‘चिमुकला संसार’, ‘गजभाऊ’, ‘बडी माँ’, ‘जीवन यात्रा’, ‘मांड’, ‘छत्रपती शिवाजी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कामा केलंय.  त्यांनतंर दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांनी त्यांच्या ‘आपकी सेवा में’ या चित्रपटात गाण्याची संधी दिली होती. यानंतर त्यांनी गायका म्हणून त्यांनी या इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला. लता मंगेशकर यांनी 36 भारतीय भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत. 1989 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. 2001 मध्ये लता मंगेशकर यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देण्यात आला.