सलमान खानच्या घरावर गोळीबार करून का आरोपी पळाले होते गुजरातला? जाणून घ्या कारण

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करून हे दोन्ही आरोपी फरार झाले होते. हे दोघेही मुंबई सोडून गुजरातला पळून गेले होते.

    सलमान खान : मुंबईमध्ये रविवारी सकाळी बॉलीवूडचा अभिनेता सलमानच्या घरावर गोळीबार झाला आहे. या घटनेची चर्चा फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये सुरु आहे. सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करून हे दोन्ही आरोपी फरार झाले होते. हे दोघेही मुंबई सोडून गुजरातला पळून गेले होते. आता ते गुजरातमध्ये कसे आणि का गेले हे उघड झाले आहे.

    आरोपी कसे गेले गुजरातला?
    गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना सांगण्यात आले की गोळीबारानंतर त्यांना वारंवार वाहतूक मोड बदलत राहावे लागले. तसेच मुंबई, महाराष्ट्रातून लवकरात लवकर बाहेर पडावे लागेल. त्यामुळे गोळीबार झाल्यानंतर लगेचच आरोपींनी त्यांची मोटारसायकल वांद्रे येथील माऊंट मेरी येथे सोडली आणि तेथून ऑटो रिक्षाने वांद्रे स्थानकाकडे गेले. मग लोकल ट्रेनने सांताक्रूझ आणि तेथून मुंबई-अहमदाबाद हायवेवर टॅक्सीने चिंचोटी, मग ट्रकने गुजरात, मग सुरत, अहमदाबाद आणि मग वेगवेगळी वाहने बदलून भुजला पोहोचले.

    गुजरातला जाण्याचं नेमकं कारण काय?
    पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोल बिष्णोई VOIP च्या माध्यमातून आरोपींच्या संपर्कात होता आणि त्यांना मार्गदर्शन करत होता. अनमोल बिष्णोईनेच त्यांना सांगितले होते की, गुन्हा केल्यानंतर त्याने बिहारला अजिबात जाऊ नये, कारण त्याचे गाव तिथे आहे. पोलीस आधी तिथे पोहोचतील. दुसरे म्हणजे, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि पंजाबमध्ये जाऊ नका कारण या भागात आमची टोळी सक्रिय आहे हे पोलिसांना माहीत आहे, त्यामुळे ते तिथे नक्कीच शोध घेतील. त्यामुळे अनमोल बिष्णोईने दोघांनाही गुजरात किंवा दक्षिण भारतात काही दिवस लपून राहण्यास सांगितले होते. यामुळेच आरोपी आधी गुजरातला पळून गेले होते.