कॅमेरा बघितल्यावर रितेश आणि जिनिलियाची मुलं का जोडतात हात ? रितेशने सांगितलं कारण

रितेश आणि जिनिलिया (Riteish Deshmukh And Genelia Deshmukh यांची दोनही मुलं त्यांच्यासोबत अनेक ठिकाणी उपस्थित असतात. मीडियाचे कॅमेरे पाहताच रिहान आणि राहिल हात जोडत सगळ्यांना नमस्कार करतात. ते असं का करतात यांचं कारण रितेश आणि जिनिलियाने उघड केलं आहे.

    रितेश देशमुख (Riteish Deshmukh) जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा ‘वेड’ (Ved Marathi Movie) हा मराठी सिनेमा 30 डिसेंबरला रिलीज झाला आहे. या चित्रपटाची कमाई लवकरच 50 कोटींच्या टप्प्यात जाणार आहे. ‘वेड’च्या निमित्ताने रितेश व जिनिलियाच्या आयुष्यातील अनेक किस्से समोर येत आहेत. रितेश आणि जिनिलिया यांची दोनही मुलं त्यांच्यासोबत अनेक ठिकाणी उपस्थित असतात. मीडियाचे कॅमेरे पाहताच रिहान आणि राहिल हात जोडत सगळ्यांना नमस्कार करतात. ते असं का करतात यांचं कारण रितेश आणि जिनिलियाने उघड केलं आहे.

    deshmukh children doing namaste

    या गोष्टीचा उलगडा करताना रितेश देशमुख म्हणाला, एकदा माझ्या मुलांनी विचारलं ते तुमचं फोटो का काढतात? रितेशनं यावर सांगितलं की, तुमचे आई-बाबा करत असलेल्या कामासाठी ते फोटो काढतायत आणि तुम्ही आमची मुलं आहात म्हणून तुमचेदेखील फोटो काढले जातात. त्यामुळे तुम्ही फक्त हात जोडून त्यांचे आभार मानायचे. आत्तापर्यंत तुम्ही असं काहीही केलेलं नाही की फोटोग्राफर्सनी येऊन तुमचे फोटो काढावेत. तरीही ते तुमचे फोटो काढतात म्हणून तुम्ही त्यांचे हात जोडून आभार मानायला हवे. त्याचे हे म्हणणं मुलांना पटलं. त्यामुळे ते फोटोग्राफर्स आणि मीडियासमोर आल्यावर सर्वांना हात जोडून नमस्कार करतात. असा खुलासा रितेशनं एका कार्यक्रमामध्ये केला.

    ritesh and genelia kids

    दरम्यान ‘वेड’ या चित्रपटाद्वारे रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. शिवाय त्याची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखने या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानही या चित्रपटात आहे. ‘वेड लावलंय’ या गाण्यावर रितेश आणि सलमान यांनी सुंदर डान्स केला आहे. ‘वेड लावलंय’ हे गाणं अजय गोगावणे आणि गायक विशाल ददलानी यांनी गायलं आहे. या गाण्यातील सलमान आणि रितेशची केमिस्ट्री सध्या प्रेक्षकांना वेड लावत आहे. ‘वेड’ चित्रपटात रितेशसह जिनिलीया देशमुख, अशोक सराफ, जिया शंकर, विद्याधर जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत.