प्रेक्षकांना कलाकारांनी कोणती भूमिका स्विकारावी हे सांगण्याचा हक्कच नसतो – ऐश्वर्या नारकर

आज जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने अभिनेत्री ऐश्वर्या नारकरशी केलेली ही खास बातचीत

    आज महिला दिन, तुझ्या दृष्टीने महिला दिन म्हणजे नेमकं काय?

    – स्त्री शक्ती ही खूप सकारात्मक शक्ती आहे. ती प्रत्येक महिलेने सकारात्मकतेने वापरली पाहिजे. महिलेकडे शारीरिक, मानसिक दोन्ही दृष्टी शक्ती ही पुरूषांपेक्षा जास्त असते. महिला या पुरूषांपेक्षा मानसिकदृष्ट्या खूप स्थिर आणि सक्षम असतो. केवळ आम्ही महिला आहोत म्हणून आम्हाला एखाद्या गोष्टीत सुट द्या किंवा महिला म्हणून मिळाणारी सहानुभूती आपण थांबवली पाहिजे. कारण महिलांकडे खूप सामर्थ्य आहे फक्त सकारात्मकपणे वापरता आलं पाहिजे. स्त्री ही एखाद्या घराला सावरते, सांभाळते आपल्या कुटुंबावर चांगले संस्कार करते. एक कुटुंब जर संस्कारी झालं तर ते आणखी चारजणांवर उत्तम संस्कार करेल. म्हणजेच महिलेवर खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे महिला  दिन केवळ साजरा करण्यासाठी नसतो तर महिला म्हणून जी जबाबदारी आहे ती उत्तमरित्या पार पाडली पाहिजे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Aishwarya (@aishwarya.narkar)

     

    आजच्या दिवशी महिलांना काय सांगशील?

    महिला दिन हा केवळ एक दिवसापूरता नसावा. तो प्रत्येक दिवशी असला पाहिजे. ही जवाबदारी महिलांची आहे. स्त्रीने स्वत:ला कधीच कमी लेखू नये. आपल्याला ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्या गोष्टी करत रहाव्यात आणि पुरूषांनाही ही जाणीव असली पाहिजे की महिली ही देखील एक माणूस आहे. तिला आपल्या बरोबरीने स्थान आहे. तीला कमी लेखता कामा नये. हा मुळ मुद्दा स्त्री असो वा पुरूष दोघांनीही सतत लक्षात ठेवायला हवा.

    सोशल मीडियामुळे प्रेक्षकांचा सेलेब्रेटींच्या आयुष्यातील हस्तक्षेप वाढलाय असं वाटतं का?

    हो, हल्ली प्रेक्षक असो किंवा सेलेब्रेटी मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर सक्रीय आहेत. तुम्ही एखाद्या सेलेब्रेटीचे फॉलोवर्स आहात याचा अर्थ त्यांच्या प्रत्येक फोटोवर वाट्टेल ती कमेंट करायलाच हवी असं नाही. आपण माणूस म्हणून एकमेकांना स्विकारलं पाहिजे. म्हणजे आपल्या एखाद्या गोष्टीवर वाईट कमेंट केल्यावर कसा त्रास होतो. तर हा असाच त्रास सेलेब्रेटींनाही होऊ शकतो याची जाणीव कमेंट करणाऱ्यांना होईल. अनेक लोकं ही फालतू कमेंट्स करण्यासाठीच सोशल मीडियाचा वापर करतात. त्यांना बाकी काही उद्योगच नसतात. सेलेब्रेटींनीही सोशल मीडियाचा वापर जपून केला पाहिजे. एखाद्या चित्रपटाच,नाटकाच मालिकेचं प्रमोशन करण्यासाठी वापर करावा.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Aishwarya (@aishwarya.narkar)

     

    ४. गापिकाबाईंच्या भूमिकेनंतर अरूणाची भूमिका कराताना अनेक निगेटीव्ह कमेट्सचा सामना तूला करावा लागला.

    – मी अनेक दिवस या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होते. कारण प्रत्येकाला आपली मतं आहेत. पण या सगळ्या निगेटीव्ह कमेंट्सचा आपल्या कामावरही परिणाम होऊ शकतो. कारण कोणतीही व्यक्तीरेखा ही कमी नसतं. प्रेक्षकांना कलाकारांनी कोणती भूमिका स्विकारावी हे सांगण्याचा हक्कच नसतो. प्रेक्षकांना जर एखादी गोष्ट आवडत नसेल तर त्यांनी ती बघू नये. आम्ही कलाकार आमच्या भूमिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तीरेखा जगत असतो. त्यामुळे कोणताही व्यक्तीरेखा आमच्यालाठी छोटी नसते. त्यामुळे मी अश्या कमेट्स करणाऱ्यांना सरळ ब्लॉक करते.

    ५. मालिकेबरोबर आणखी कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेस.

    – सध्यातरी मालिकेवरच मी लक्षकेंद्रीत केलय. संपूर्ण ऑनलॉक होत नाही तोपर्यंत नाटक करण्याचा काही विचार नाहीये. पण एखादी चांगली व्यक्तीरेखा आली तर नक्कीच वेबसिरीज करण्याचा विचार आहे. त्याचप्रमाणे धडक नंतर बॉलिवूडमध्ये एखादा चागलं काम मिळालं तर नक्कीच करायला आवडेल.

    ६. ‘श्रीमंता घरची सून’ या मालिकेत आता प्रेक्षकांना पुढे काय बघायला मिळणार?

    – मुख्यत: तत्व, संस्कार, आणि मध्यवर्गीय यांच्या जगण्यातील संघर्ष यावर ही मालिका आधारीत आहे. या सगळ्यागोष्टी मालिकेतून छोट्या छोट्या पदधतीने आधोरेखीत करण्यात आल्या आहेत. या मालिकेतून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यामुळे लोकांचा दृष्टीकोन बदलू शकतो. बाकीच्या मालिकांप्रमाणे काहीसा ड्रामाही या मालिकेत आहे. लोकांना आवडणाऱ्या प्रत्येक घटना मालिकेत आहेत.