आज जागतिक रंगकर्मी दिनानिमित्त, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदतर्फे ‘उषा नाडकर्णी’ यांचा सन्मान

आतापर्यंत भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, किशोर प्रधान व शोभा प्रधान, गंगाराम गव्हाणकर, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर आणि अशोक सराफ (Bhalchandra Pendharkar, Madhukar Tordamal, Kishore Pradhan and Shobha Pradhan, Gangaram Gavankar, Vikram Gokhale, Dilip Prabhavalkar and Ashok Saraf) या मान्यवर ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारांचा सत्कार करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी आपल्या सर्वांच्या लाडक्या "आऊ" श्रीमती उषा नाडकर्णी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

    मुंबई : जागतिक रंगकर्मी दिनानिमित्त, (World Artists Day) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad) व संलग्न ‘मराठी नाट्य कलाकार संघा’च्या वतीने २०१४ सालापासून जागतिक रंगकर्मी दिवस साजरा केला जात आहे. रंगभूमीवर प्रामाणिक प्रेम करणाऱ्या सक्रिय रंगकर्मींचाही हक्काचा एक दिवस असावा, या उद्देशाने ज्यांनी रंगभूमीवर सर्वस्व वाहिले आहे, अशा भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून हा दिवस ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. दरम्यान, या निमित्ताने एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मींचा सत्कार करून त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यात येते.

    दरम्यान, आतापर्यंत भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, किशोर प्रधान व शोभा प्रधान, गंगाराम गव्हाणकर, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर आणि अशोक सराफ (Bhalchandra Pendharkar, Madhukar Tordamal, Kishore Pradhan and Shobha Pradhan, Gangaram Gavankar, Vikram Gokhale, Dilip Prabhavalkar and Ashok Saraf) या मान्यवर ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारांचा सत्कार करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी आपल्या सर्वांच्या लाडक्या “आऊ” श्रीमती उषा नाडकर्णी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

    मागील वर्षीपासून कलाकार संघाने गरजू वृद्ध कलाकारांना आर्थिक सहाय्य निधी योजना सुरू केली असून, ब-याच दानशूर कलावंतानी या योजनेसाठी निधी दिला आहे. यावर्षी १४ जणांना या धनादेशचे वाटप करण्यात येणार आहे. श्री. ज्ञानेश पेंढारकर यांचा सांगीतिक कार्यक्रम सादर होणार असून, हा जागतिक रंगकर्मी दिवस सोहळा सर्व कलाकारांनी एकत्र येऊन साजरा करावा हा संघाचा मानस आहे. आज हा सोहळा मुंबईतील दामोदर नाट्यगृह, परळ येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे.