shyam pethkar

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची व्यथा 'तेरवं' या नाटकाच्या रूपाने प्रकर्षाने लोकांपुढे आली.

नागपूर. श्याम पेठकर (Shyam Pethkar) लिखित ‘तेरवं’ या नाटकाला महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या रा. शं. दातार नाट्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरवर्षी पुरस्कार प्रदान सोहळा पुण्यामध्ये ‘मासूम’ संस्था आणि ‘साधना ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येतो, परंतू यंदा कोरोनामुळे याला बगल देण्यात  आली.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची व्यथा ‘तेरवं’ या नाटकाच्या रूपाने प्रकर्षाने लोकांपुढे आली. या नाटकाचे वैशिट्य म्हणजे, चक्क आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी यात सर्व पात्र रंगविले आहे. ज्यांनी हे सर्व भोगले आहे त्यांनी स्वतःच त्यांच्या व्यथा भूमिकेच्या माध्यमांतून लोकांसमोर मांडल्याने शेतकरी आत्महत्येची दाहकता जाणतांना अंगावर काटा उभा राहतो. लेखक श्याम पेठकर आणि हरिष इथापे यांच्या या अभूतपूर्व प्रयत्नाने नाट्य क्षेत्रात वेगळा इतिहास रचला आहे.