Mi TV युजर्ससाठी खुशखबर, रिलीजपूर्वीच पाहता येणार बॉलिवूड सिनेमे

शाओमीच्या Mi TV युजर्ससाठी खुशखबर आहे. कंपनी युजर्सला डिझ्ने + हॉटस्टारवर रिलीज होणाऱ्या बॉलिवूड सिनेमांचा ॲक्सेस ऑफिशिअल रिलीजच्या २ तास आधी देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच Mi TV युजर्सला इतरांपेक्षा २ तास आधीच सिनेमा पाहता येणार आहे.

मुंबई : शाओमीने ऑनलाइन कॉन्टेंट प्लेअर डिझने + हॉटस्टारसोबत भागीदारी केली आहे. या अंतर्गत Mi TV युजर्स बॉलिवूड सिनेमा रिलीज होण्याच्या दोन तास आधीच पाहता येणार आहे. ३१ जुलैपासून कंपनीने मल्टीप्लेक्स बॅनर फीचर सुरू झाले असल्याचे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. हे फीचरमुळे मी टीव्ही युजर्सला बॉलिवूड सिनेमांचा ॲक्सेस ऑफिशिअल रिलीज (7.30 PM) पूर्वी दोन तास आधीच (5.30 PM) मिळणार आहे.

भागीदारी अंतर्गत Mi Tv-पॅचवॉल युजर्सला फर्स्ट-डे, फर्स्ट-ॲक्सेस देण्यात येईल असे शाओमीने स्पष्ट केले आहे. या अंतर्गत युजर्स OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारे लूटकेस, लक्ष्मी बॉम्ब आणि भुज: द प्राइड ऑफ इंडिया सारखे सिनेमे इतरांच्या आधी पाहता येणार आहेत. हे सर्व सिनेमे मी टीव्हीच्या होम स्क्रीनच्या पॅचवॉलवर फीचर करण्यात येणार आहेत. यामुळे युजर्सला या सिनेमांचा आनंद घेता येणार आहे. अशाप्रकारे एम आय युजर्सला खासकरून Early Access दिला जाणार आहे.

कोरोना महामारीच्या काळात भारतीय ग्राहकांची गरज लक्षात घेता डिझने + हॉटस्टार सोबत केलेली भागीदारी आम्ही अशीच पुढे नेत आहोत आणि सिनेचाहत्यांना ऑफिशिअल रिलीजच्या दोन तास आधीच बॉलिवूड सिनेमे पाहण्याची सुविधा देत असल्याचे मी टीव्हीचे अधिकारी ईश्वर नीलकांतन यांनी या भागीदारीविषयी सांगितले.

अनेक मोठे सिनेमे येत आहेत ऑनलाइन

कोरोना काळात सिनेमा थिएटर्स सध्या तरी बंद ठेवण्यात आली आहेत. अशातच अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही थांबले आहे, तर जे चित्रपट बनून तयार आहेत ते ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येत आहेत. याची सुरुवात अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराणाचा सिनेमा ‘गुलाबो सिताबो’ने झाली आहे. यानंतर 24 जुलैला दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा सिनेमा दिल बेचाराही ऑनलाइनच रिलीज झाला आहे. याने व्ह्युअरशिपचे अनेक विक्रम मोडले. यानंतर आता लक्ष्मी बॉम्ब आणि  भुज सारखे मोठे सिनेमेही ऑनलाइनच रिलीज होणार आहेत.