‘रसोड़े में कौन था’ फेम यशराज मुखाटे अडकला विवाहबंधनात, साध्या पद्धतीनं गर्लफ्रेंडसोबत केलं रजिस्टर मॅरेज!

यशराज मुखाटेने 28 फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. दरम्यान अनेक कलाकारांनी त्याच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

    सध्या मनोरंजनसृष्टीत लग्नाचा सिझन सुरू आहे. अनेक अभिनेता अभिनेत्री विवाहबंधनात अडकले आहे तर येत्या काही दिवसात अनेक कलाकार बोहल्यावर चढणार आहेत. आता  ‘रसोड़े में कौन था’ या मॅशअपने सोशल मिडीयावर धुमाकुळ घालणारा यशराज मुखोटे विवाह बंधनात (Yashraj Mukhate Wedding) अडकला आहे. कोणताही थाट न करता अत्यंत साध्या पद्धतीनं त्यानं गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यासोबत सेलेब्रिटीही त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

    साध्या पद्धतीनं बांधली लग्नगाठ

    यशराज मुखाटेने त्याची गर्लफ्रेंड अल्पना हिच्याशी लग्न केलं आहे. अगदी साध्या पद्धतीने यशराज लग्न झालं. रजिस्टर मॅरेज करत त्याने त्याच्या लग्नाची घोषणा केली. त्याच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत त्याच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यशराजच्या या पोस्टमुळे अनेकांना सुखद धक्का बसला आहे. अभिनेत्री शहनाज गिल हीने देखील यशराजच्या पोस्टवर कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

    एका गाण्याने रातोरात मिळाली प्रसिद्धी

    कोरोनाच्या काळात ‘रसोड़े में कौन था’ या मॅशअपने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. दरम्यान हा मॅशअप लोकांनाही खूप आवडला होता. यामुळे यशराज मुखाटे हा घराघरात पोहोचला. यशराजची सोशल मीडियावर चांगलीच फॅन फॅालोविंग आहे. नुकतंचयशराज म्युझिक अल्बमही नुकताच लॉन्च झाला आहे. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  .’मन धागा’ असे या म्युझिक अल्बमचे नाव असून अमित त्रिवेदी आणि जसलीन रॉयल आणि यशराज मुखाटे यांनी हे गाणे गायले आहे. हे गाणं अन्विता दत्त यांनी लिहिले असून यशराज मुखाटेने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. यशराजच्या ऑफीशअल युट्युब अकाऊंटवर हे गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. त्याच्या या गाण्याला देखील बरीच पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळतंय.