Om Sweetu attended fans wedding

ओम आणि स्वीटू (Om And Sweetu) यांनी १९ डिसेंबर रोजी ज्या जोडप्यांची लग्न आहेत त्यांना त्यांची विवाह पत्रिका सोशल मीडियावर पाठवायचं आवाहन केलं. त्यातील एका जोडीच्या लग्नात उपस्थिती दर्शवण्याचं प्रॉमिस केलं. त्यांनी केलेल्या प्रॉमिस (Promise By Om And Sweetu) प्रमाणेच प्रेक्षक-चाहते सौरभ आणि जुही यांच्या लग्नात ओम आणि स्वीटू यांनी हजेरी (Om And Sweetu Attended Fans Wedding) लावली.

    झी मराठीवरील (Zee Marathi) ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayala) या मालिकेतील प्रमुख जोडी ओम आणि स्वीटू (OM And Sweetu)ही प्रेक्षकांची आवडती आहे. या दोघांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. दोघांचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. मालिकेत नुकतंच ओम आणि स्वीटू यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. अखेर ओम आणि स्वीटू एकत्र आले आणि याचा आनंद प्रेक्षक आणि चाहत्यांनादेखील झाला. हा आनंद एका अनोख्या पद्धतीनं ओम आणि स्वीटू यांनी आपल्या चाहत्यांसोबत साजरा केला.

    ओम आणि स्वीटू यांनी १९ डिसेंबर रोजी ज्या जोडप्यांची लग्न आहेत त्यांना त्यांची विवाह पत्रिका सोशल मीडियावर पाठवायचं आवाहन केलं. त्यातील एका जोडीच्या लग्नात उपस्थिती दर्शवण्याचं प्रॉमिस केलं. त्यांनी केलेल्या प्रॉमिस प्रमाणेच प्रेक्षक-चाहते सौरभ आणि जुही यांच्या लग्नात ओम आणि स्वीटू यांनी हजेरी लावली आणि या नवदाम्पत्याला त्यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांना आपल्या लग्नात पाहून या जोडप्याला सुखद धक्काच बसला आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांची ती प्रतिक्रिया आणि ओम स्वीटू सोबत त्यांचा एक झकास फोटो सोशल मीडियावर शेअर केला.