‘ओव्हर ॲक्टिंगचे ५० रूपये कापा’,‘येऊ कशी तशी मी नांदायला’मधील स्वीटूची आई होतेय ट्रोल!

ओम आणि स्वीटूची लव्हस्टोरी पाहायला मिळतेय. पण या प्रेमाला स्वीटूच्या आईचा म्हणजेच विरोध आहे. या मालिकेचा नवीन प्रोमो रिलीज झाला आणि तो पाहून लोकांनी स्वीटूच्या आईची खिल्ली उडवायला सुरूवात केली.

  येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. आता सोशल मीडियावर कायम ही मालिका चर्चेत असते. मालिकेतील पात्र, तयांचे संवाद, व्हिडीओवरून अनेकदा ट्रोलिंगही होतं. सध्या या मालिकेतील स्वीटूची आई सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतेय. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत ओम आणि स्वीटूची लव्हस्टोरी पाहायला मिळतेय. पण या प्रेमाला स्वीटूच्या आईचा म्हणजेच विरोध आहे. या मालिकेचा नवीन प्रोमो रिलीज झाला आणि तो पाहून लोकांनी स्वीटूच्या आईची खिल्ली उडवायला सुरूवात केली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

  काय म्हणाले प्रेक्षक

  स्वीटू ओमशी फोनवर बोलत असते. हे पाहून तिच्या आईचा संताप अनावर होतो आणि ती लेकीचा फोन चक्क आगीत फेकून देते, असा एक सीन प्रोमोमध्ये आहे. या सीनवरून स्वीटूची आई ट्रोल होतेय.

  हिच्या ओव्हर अ‍ॅक्टिंगचे ५० रूपये कापा, आधीच भीकेचे डोहाळे आणि नाटक बघा, मोबाईल आगीत अशा काय काय कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. नलू यार अशी का वागते? असे एका युजरने लिहित स्वीटूच्या आईची मजा घेतली आहे. अनेक मजेशीक कमेंट्स या पोस्टवर आल्या आहेत.