yeu kashi kashmi nandayla

आपलं माहेर, सुखाचं-हक्काचं माहेर सोडून मुलगी एका वेगळ्याच कुटुंबात प्रवेश करते. असं घर जे इथून पुढे तिचं होणार असतं. या प्रवासात तिला पतीची साथ असली तरी एका जिवाभावाच्या मैत्रिणीची तिला कायमच उणीव भासत असते. अशावेळी सासूच जर तिची सखी झाली तर  नात्यांचा गोडवा अधिकच वाढतो. आणि घराचं गोकुळ होतं. अशाच एका गोड नात्याची कथा सांगणारी मालिका झी मराठीच्या प्रेक्षकांना लवकरच पहायला मिळणार आहे 'येऊ कशी तशी मी नांदायला'

आपलं माहेर, सुखाचं-हक्काचं माहेर सोडून मुलगी एका वेगळ्याच कुटुंबात प्रवेश करते. असं घर जे इथून पुढे तिचं होणार असतं. या प्रवासात तिला पतीची साथ असली तरी एका जिवाभावाच्या मैत्रिणीची तिला कायमच उणीव भासत असते. अशावेळी सासूच जर तिची सखी झाली तर  नात्यांचा गोडवा अधिकच वाढतो. आणि घराचं गोकुळ होतं. अशाच एका गोड नात्याची कथा सांगणारी मालिका झी मराठीच्या प्रेक्षकांना लवकरच पहायला मिळणार आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’

yeu kashi kashi mi nandayla

ही गोष्ट आहे शकु आणि स्वीटूची .. नात्यानं या दोघी सासू सून आहेत पण मनानं मैत्रीच्या धाग्यानं घट्ट बांधल्या गेल्या आहेत.मिश्किल सासू आणि खट्याळ सून मिळून घरात वेगळीच गंमत आणतात. आणि या गंमतीचच नाव आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

या मालिकेची पटकथा – सुखदा आयरे, कथा विस्तार -समीर काळभोर, आणि संवाद किरण कुलकर्णी- पल्लवी करकेरा यांचे आहेत. मालिकेचे दिगदर्शक अजय मयेकर आहेत. शुभांगी गोखले,अदिती सारंगधर,दीप्ती केतकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. शाल्व किंजवडेकर नायकाच्या भूमिकेत आणि अन्विता फलटणकर नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका नवी मालिका येऊ कशी तशी मी नांदायला सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.