कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी हनी सिंगचा जबाब, युएईच्या घराबाबत केलं ‘हे’ वक्तव्य

पॉप सिंगर यो यो हनी सिंह(Yo Yo Honey Singh) विरोधात त्याची पत्नी शालिनी तलवारने(Shalini Talwar) घरगुती हिंसाचाराची (Domestic Violence) तक्रार दिल्लीतील(Delhi) तीस हजारी कोर्टात(Tis Hazari Court) दाखल केली होती.

  गेल्या काही दिवसांपासून हनी सिंग त्याच्या वैयक्तिक गोष्टीमुळे जास्त चर्चेत आला आहे. पॉप सिंगर यो यो हनी सिंह(Yo Yo Honey Singh Replied To Court) विरोधात त्याची पत्नी शालिनी तलवारने(Shalini Talwar) घरगुती हिंसाचाराची (Domestic Violence) तक्रार दिल्लीतील(Delhi) तीस हजारी कोर्टात(Tis Hazari Court) दाखल केली होती. दरम्यान या प्रकरणात हनी सिंगचा जबाब नोंदवण्यात आला आहे. दिल्लीतील तीस हजारी कोर्टाने आधीच्या सुनावणीवेळी हनी सिंगच्या युएईमधील( Notice For Home In United Arab Emirates) घराबाबत नोटीस बजावली होती.हनी सिंगने सांगितले आहे की, युएईमधील घर तो विकणार नाही.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Yo Yo Honey Singh (@yoyohoneysingh)

  गायक हनी सिंग कोर्टाला जबाब देताना म्हणाला की, युएईमधील त्यांच घर तौ विकू शकत नाहीत.जोपर्यंत सगळ्या प्रकरणाचा उलगडा होत नाही तोपर्यंत घर विकणार नाही.

  कोर्टाने हनी सिंगला निर्देश दिले होते की, तो सध्या स्वत:च्या किंवा त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून आपली संपत्ती विकू शकत नाहीत. तसेच कोर्टाने हनी सिंगला त्याच्या कंपनीची कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर हनी सिंगने संपत्ती विकणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

  दरम्यान हनी सिंगचे वकील रेबेक्का जॉन यांच्या मते हनी सिंगवर जरी त्याच्या पत्नीकडून कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झाले असले तरी त्याला त्याची संपत्ती विकण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याला कुणीही थांबवू शकत नाही.