zarina khan

समारंभाच्या आयोजकांनी झरीन खान आणि तिच्या व्यवस्थापकाविरुद्ध नरकेलडांगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

  पश्चिम बंगालच्या सियालदह न्यायालयाने सोमवारी बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानला फसवणूक प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर (Zareen Khan granted bail) केला. झरीनविरुद्ध एका कार्यक्रमा संबधी १२ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर, जरीन खानला पोलिसांच्या परवानगीशिवाय परदेशात जाता येणार नाही, असाही आदेश न्यायालयाने दिला आहे.

  नेमकं प्रकरण काय?

  प्रकरण 2018 चा आहे. झरीन खानवर कोलकाता येथील दुर्गापूजा समारंभात परफॉर्म करण्यास होकार दिल्याचा आरोप आहे. यासाठी 12 लाख रुपये अॅडव्हान्स घेण्यात आले, मात्र ती कार्यक्रमाला हजर राहिली नाही. यानंतर समारंभाच्या आयोजकांनी झरीन खान आणि तिच्या व्यवस्थापकाविरुद्ध नरकेलडांगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

  पोलिसांच्या परवानगी शिवाय देश सोडता येणार नाही

  कोलकाता पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय तिला देश सोडता येणार नाही, अशी अटही न्यायालयाने घातली आहे. जरीन खान मुंबईहून सियालदह न्यायालयात हजर राहण्यासाठी आली होती. न्यायालयाने त्यांना प्रत्येक सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले. सप्टेंबरमध्ये न्यायालयाने या प्रकरणी जरीन खानविरोधात अटक वॉरंट जारी केले होते

  या सुनावणीसाठी जरीन खान न्यायालयात हजर झाली. त्याच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सियालदह न्यायालयाने जरीनला 30,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर 26 डिसेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला.