झी ला मिळाला तारणहार, सोनीसोबत कंपनीचे होणार merger, पुनीत गोयंकाच एमडी आणि सीईओपदी कायम

पुनित गोयंका (Punit Goenka) विलिनीकरणानंतर कंपनीचे एमडी आणि सीईओ (MD And CEO) म्हणून कायम राहतील. विलीन कंपनीमध्ये सोनी पिक्चर्सच्या (SPNI) भागधारकांचा बहुसंख्य हिस्सा असेल. टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल मीडियामध्ये झीची उपस्थिती आहे.

  नवी दिल्ली : संकटात सापडलेल्या मनोरंजन कंपनी झी एंटरनेटमेंट एंटरप्राइजेज लिमिडेट (ZEEL) ला तारणहार मिळाला आहे. कंपनीने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या बोर्डाने सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (SPNI) आणि ZEEL च्या विलिनीकरणाला तत्वतः मान्यता दिली आहे.

  या करारानुसार, पुनित गोयंका (Punit Goenka) विलिनीकरणानंतर कंपनीचे एमडी आणि सीईओ (MD And CEO) म्हणून कायम राहतील. विलीन कंपनीमध्ये सोनी पिक्चर्सच्या (SPNI) भागधारकांचा बहुसंख्य हिस्सा असेल. टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल मीडियामध्ये झीची उपस्थिती आहे. या बातमीनंतर झी च्या शेअर्सनी बाजार सुरू होताच १० टक्क्यांनी उसळी घेतली आहे.

  सोनी पिक्चर्समध्ये झी एंटरटेनमेंटचे विलिनीकरण झाल्यानंतरही झी ग्रुपचे एमडी आणि सीईओ पुनित गोयंका आपल्या पदावर कायम राहणार ही दिलासादायक बाब आहे. व्यवहारानुसार सोनी पिक्चर्समध्ये विलिनीकरणानंतर होणाऱ्या कंपनीत १.५७५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. गुंतवणूक केलेल्या रकमेचा वापर चॅनलच्या वाढीसाठी करण्यात येणार आहे.

  झी एंटरटेनमेंटचे भागधारक ४७.०७ टक्के आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क ५२.९३ टक्के नवीन संस्थेत राहतील. कंपनीने बुधवारी २२ सप्टेंबर रोजी सकाळी नियामक दाखल करताना विलीनीकरणाविषयी माहिती दिली आहे. झी ग्रुपचे एमडी आणि सीईओ पुनित गोयनका यांना सोनी पिक्चर्समध्ये झी एंटरटेनमेंटच्या विलीनीकरणानंतर झी एंटरटेनमेंट म्हणून सुरू ठेवण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

  पुनित गोयंका यांना हटवण्याची मागणी

  गेल्या आठवड्यात कंपनीचे अव्वल गुंतवणूकदार इन्वेस्कोने पुनित गोयंकासह तीन संचालकांना मंडळातून काढून टाकण्याची मागणी केली होती. अमेरिकेतील स्वतंत्र गुंतवणूक कंपनी इन्व्हेस्कोच्या मालकीच्या इन्व्हेस्को डेव्हलपिंग मार्केट्स फंड आणि ओएफआय ग्लोबल चायना फंडने कंपनीच्या संचालकांना काढून टाकण्याची आणि सहा नवीन स्वतंत्र मंडळाच्या सदस्यांना समाविष्ट करण्यासाठी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग (ईजीएम) आयोजित करण्याची मागणी केली आहे. इन्वेस्कोची झीमध्ये १७.८८ टक्के हिस्सेदारी आहे. जुलै २०१९ मध्ये, इन्व्हेस्कोने झीच्या प्रवर्तकांशी कंपनीमध्ये ११ टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी करार केला.