
विराजस कुलकर्णीनेच हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावरून शेअर करून मालिकेच्या चाहत्यांना धक्का दिला आहे.
झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या लोकप्रिय मालिकेच्या आगामी भागामधील एक लहानसा व्हिडीओ काल सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि सगळीकडे एकच गोंधळ उडाला. या व्हिडीओमध्ये आदित्यला गोळी लागताना दिसत असून तो खाली कोसळतो असं दिसतंय. विराजस कुलकर्णीनेच हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावरून शेअर करून मालिकेच्या चाहत्यांना धक्का दिला आहे.
View this post on Instagram
त्याने कॅप्शनमध्ये असं देखील म्हंटल आहे कि, “प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट ठरलेला असतोच. तुम्ही सर्वांनी आदीच्या पूर्ण प्रवासात साथ दिली आहेत. त्याला दिलेल्या प्रेमासाठी आभार. आता त्याला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.” त्याचवेळी गौतमी देशपांडे हीने देखील एक असा फोटो शेअर केला आहे ज्याने या गोंधळात अजूनच भर पडली आहे. हातात पिस्तूल घेऊन गोळी झाडणाऱ्या सईचा हा फोटो असून या दोन्हीचा एकमेकांशी काय संबंध आहे? खरंच आदित्यचा मृत्यू होणार आहे का? सईच आदित्यवर हल्ला करणार? की कोणा दुसऱ्याने केलेल्या हल्याला परतवून लावण्यासाठी सईने हातात शस्त्र घेतलं आहे? असे अनेक प्रश्न उपस्थीत झाले आहेत.
View this post on Instagram
‘माझा होशील ना’ मालिकेच्या पुढच्या काही भागात या साऱ्या प्रश्नाची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे. आदित्यला त्याच्या पूर्वायुष्याबद्दल आणि तो आदित्य ग्रुप ॲाफ कंपनीज चा मालक असल्याबद्दलही कळणार आहे असं सूत्रांकडून समजले आहे. त्यामुळे या हल्ल्याचा आणि आदित्यच्या पूर्वायुष्याचा संबंध नसेल ना हे पाहणं औस्त्युक्याचं ठरेल.