
हा व्हिडीओ आर्या म्हणजेच सोनाली पाटील आणि डॉक्टर म्हणजेच किरण गायकवाड यांनी ऑफस्क्रीन धम्माल म्हणून केला आहे.
‘देवमाणूस’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेत दररोज येणाऱ्या नवनवीन ट्वीस्टमुळे चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. या मालिकेत अजित कुमार देव उर्फ देवीसिंग म्हणजेच डॉक्टरने अनेक निष्पाप महिलांचा बळी घेतला आहे. सध्या अजित कुमारवर कोर्टात खटला सुरू आहे. त्याचे हे गुन्हे सर्वांसमोर आणून त्याला शिक्षा देण्यासाठी मालिकेत एका सरकारी महिला वकीलची एन्ट्री झाली आहे. या वकीलचं नाव आर्या असं आहे. मात्र आत्ता आर्यासुद्धा डॉक्टरच्या जाळ्यात अडकल्याचं म्हटलं जात आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ आर्या म्हणजेच सोनाली पाटील आणि डॉक्टर म्हणजेच किरण गायकवाड यांनी ऑफस्क्रीन धम्माल म्हणून केला आहे. या दोघांनी सेटवर मजामस्ती करत असताना हा व्हिडीओ बनवला आहे. व्हिडिओत आर्या लाजत पुढे जात आहे तर डॉक्टर तिच्या मागे मागे येत आहे. आणि पाठीमागे ‘देवमाणूस’ चं संगीतसुद्धा वाजत आहे.
View this post on Instagram
असा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना असंचं वाटत आहे, की हा मालिकेतील एक भाग आहे. आणि आर्या डॉक्टरच्या जाळ्यात अडकली आहे. मात्र असं नाहीय हा व्हिडीओ कलाकारांच्या ऑफस्क्रीन धम्मालचा आहे.