
अभिनेत्री रसिका सुनीलने काही वेळेपूर्वी आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती एयरपोर्ट असल्याचं दिसतय.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे रसिक सुनील. तिने साकारलेली शनाया आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. रसिका नेहमीचं आपल्या बिनधास्त अंदाजामुळे ओळखली जाते. कधी ती आपल्या बोल्ड लुकमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेते, तर कधी आपल्या बॉयफ्रेंडबरोबर फोटोमुळे चर्चेत येते. सध्या रसिकाचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. त्यामध्ये ती आपल्या बॉयफ्रेंडला घेण्यासाठी एयरपोर्टवर आली आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री रसिका सुनीलने काही वेळेपूर्वी आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती एयरपोर्ट असल्याचं दिसतय. ती आपला बॉयफ्रेंड आदित्य बिलागीला घेण्यासाठी येथे आली आहे. मात्र आदित्य तिच्या जवळ येईपर्यंत तिला मूळीचं दम निघत नाही. ती जागेवर उड्या मारू लागते. आणि आदित्य जवळ येताच त्याला एक घट्ट मिठी मारते. सध्या रसिकाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतं आहे.
View this post on Instagram
रसिकाने काही महिन्यांपूर्वी आपण आदित्य बिलागीसोबत नात्यात असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासूनचं सोशल मीडियावर या जोडीची विशेष चर्चा असते. आदित्यने व्हेलेंटाईन डेला खास अंदाजात रसिकाला प्रपोजदेखील केलं होतं. त्यांनतर एक सुंदर हेलिकॉप्टर राईडसुद्धा केली होती. यामुळे ते दोघे खुपचं चर्चेत आले होते.