वाढत्या वयासोबतच घाला सौंदर्यातही भर; जाणून घ्या ‘या’ सोप्या टिप्स

. वाढते वय व तणाव यांचा परिणाम त्वचेवर दिसू नये यासाठी आपल्या सौंदर्याकडे लक्ष देणे आवश्यक असते.

  वाढत्या वयासोबत सौंदर्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. स्वतःची काळजी घेणे व हेल्दी राहणे हे स्त्रियांसाठी कठीण काम ठरते. वाढते वय व तणाव यांचा परिणाम त्वचेवर दिसू नये यासाठी आपल्या सौंदर्याकडे लक्ष देणे आवश्यक असते.

  डॉक्टरांकडून तपासणी
  आपल्या शरीराची काळजी आपणच घ्यायला हवी. वयाच्या चाळीशीनंतर नियमित आरोग्य तपासणी करायला हवी. ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल इत्यादी तपासण्या वेळच्या वेळी व्हायला हव्या.

  व्यायाम
  दररोज व्यायामामुळे शरीराप्रमाणेच आपल्या व्यक्तिमत्वावरही प्रभाव पडतो. रोज थोडा वेळ काढून वर्कआऊट करा.

  सन प्रोटेक्शन
  दररोज सन प्रोटेक्शनचा वापर करा. कुठेही जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा. यामुळे उन्हातील हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण होईल.

  धुम्रपान टाळा
  धुम्रपान शरीराच्या प्रत्येक भागाला प्रभावित करते. यामुळे कॅन्सर, ह्रदयरोग व स्ट्रोकचा धोका वाढतो. तुमच्या त्वचेवरही वाईट परिणाम होतो.