वयानुसार बदला फॅशन; वापरा या गोल्डन टिप्स

तुम्हाला कोणत्या प्रकारचे कपडे आणि आउटफिटपासून दूर राहायचे आहे. वाचा सविस्तर

    जर आपण वयाची चाळीशी पार केली आहे पण आपण अजूनही तारुण्यातच असल्यासारखे दिसतात. तरीही आपम आपल्या वयानुसार आपल्या फॅशनमध्ये थोडाफार बदल करणे अपेक्षित आहे. तेव्हा लक्षात ठेवा की, तुम्हाला कोणत्या प्रकारचे कपडे आणि आउटफिटपासून दूर राहायचे आहे.

    १. वयाच्या चाळीशीनंतर आपल्या पायांचे वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. यामुळे मिनी स्कर्ट आणि घट्ट लेदर पँट घालू नका. आपल्या पायांचा आकार दिसेल असे कपडे घालणे टाळा.

    २. कधीही ग्लिटर वापरु नका. मग ते मेकअप असो वा कपडे.

    ३. खूप टाईट कपडे वापरु नका. पण योग्य फिटींगवाले कपडे घाला. अगदी ढिले कपडे आपल्यावर शोभून दिसणार नाही.

    ४.  लक्षात ठेवा, वेव्ही कपडे आणि चंकी ज्वेलरी आपल्यावर शोभून दिसणार नाही. यासाठी साधी आणि सुंदर ज्वेलरी घाला.