खोबरेल तेलात आहे तारुण्य टिकवून ठेवण्याची शक्ती; जाणून घ्या खोबरेल तेलाचे अद्भुत फायदे

खोबऱ्याच्या तेलाने तुमच्या हाताच्या बोटांना मसाज करा. त्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. तसेच नखांनाही मसाज करणे फायदेशीर ठरते.

  खोबऱ्याचे तेल आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते. यातील औषधी तत्त्व आपले आरोग्य, सौंदर्य आणि केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी फायदेशीर ठरते. खोबऱ्याचे तेल केस आणि त्वचेला नैसर्गिक पद्धतीने मुलायम बनवते. तसेच केसांनाही चमकदार बनवण्यासाठी तुम्ही खोबऱ्याच्या तेलाचा वापर करू शकता. त्वचेला मॉयश्चराइझ करायचे असल्यासही खोबऱ्याचे तेल गुणकारी ठरते.

  – खोबऱ्याचे तेल ड्राय स्कीनला मुलायम बनवण्यासाठी फायदेशीर असते. आंघोळीच्या आधी खोबऱ्याच्या तेलाने संपूर्ण शरीराची मालिश करा आणि त्यानंतर आंघोळ करा.

  –  डार्क सर्कल्स आणि सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर होतो. यामध्ये अॅन्टी-एजिंग तत्त्व मोठ्या प्रमाणावर असतात. तेलाचे काही थेंब घेऊन डोळ्यांच्या खाली मसाज करा.

  – खोबऱ्याचे तेल सनबर्नपासूनही त्वचेची रक्ष करते.

  – घामामुळे होणाऱ्या घामोळ्यांवरही खोबऱ्याचे तेल औषध म्हणून काम करते. त्याचप्रमाणे खाज येत असेल तर त्यावर खोबऱ्याचे तेल लावल्याने त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो आणि पुन्हा खाज येत नाही.

  – साखरेमध्ये खोबऱ्याच्या तेलाचे काही थेंब टाकून त्याचा स्क्रब म्हणून वापर करू शकता. त्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्कीन आणि टॅनिंग दूर होण्यास मदत होईल.

  – चेहऱ्यावरील पिम्पल आणि पुरळ किंवा एखाद्या जखमेचे व्रण घालवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करा. त्यामुळे व्रण दूर होतील.

  – मेकअप उतरवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या क्लिंजिंग मिल्कऐवजी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करा. कापसाचा बोळा खोबऱ्याच्या तेलात भिजवून त्याच्या मदतीने चेहऱ्यावरील मेकअप काढा.

  – खोबऱ्याच्या तेलाने तुमच्या हाताच्या बोटांना मसाज करा. त्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. तसेच नखांनाही मसाज करणे फायदेशीर ठरते. त्यामुळे नखांच्या बाजूची स्कीन निघत नाही आणि नखांवर चकाकी येते.

  – टाचांना भेगा पडल्या असतील तर त्यासाठीही खोबऱ्याचे तेल गुणकारी ठरते. खोबऱ्याच्या तेलामध्ये चिमूटभर हळद घालून ते मिश्रण टाचांवर लावा. असे केल्याने टाचा मऊ होतात.