चेहऱ्यावरील मुरुमावर असे करा घरच्या घरी उपाय

मुरमांमुळे त्वचा खडबडीत होते. सौंदर्यावर त्यामुळे डाग पडतो. चारचौघात जाणेही त्रासदायक वाटते. मुरम कोणत्याही वयात होऊ शकतात. तेलकट त्वचेच्या लोकांना मुरमाचा त्रास जास्त होतो. त्यातही उन्हाळ्यात याचे प्रमाण आणखी वाढते.

 मुरमांमुळे त्वचा खडबडीत होते. सौंदर्यावर त्यामुळे डाग पडतो. चारचौघात जाणेही त्रासदायक वाटते. मुरम कोणत्याही वयात होऊ शकतात. तेलकट त्वचेच्या लोकांना मुरमाचा त्रास जास्त होतो. त्यातही उन्हाळ्यात याचे प्रमाण आणखी वाढते. मुरम कमी करण्याचा प्रयत्न केल्यास ते वाढतातही. म्हणूनच खाली दिलेल्या काही गोष्टींकडे लक्ष दिले तर मुरमाचा त्रास नक्की कमी होऊ शकतो.

 
* गुलाबपाणी आणि कापूर यांचे मिश्रण एका बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. मुरूम जेव्हा होतील, त्यावेळी कापसाने हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. हे केल्याने नक्कीच मुरूम कमी होतील.
 
* संपूर्ण चेहऱ्यावर मुरूम पसरले असतील तर हळद आणि कडुलिंबाची पाने एकत्रित वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि चेहर्‍यावर लावा. त्याने चेहरा स्वच्छ होईल. कारण लिंबाची पाने रोगप्रतिकारक असतात.
 
* उन्हाळ्यात त्वचा तेलकट होते. प्रदुषणामुळे चेहरा काळा पडतो व नियमितपणे साफ न झाल्यामुळे मुरूम होतात. चेहऱ्यावर स्वच्छ ठेवण्यासाठी बेसनात काकडीचा रस टाकून पेस्ट बनवून चेहऱ्याला लावल्याने चेहरा साफ व स्वच्छ होतो. हे फेस पॅकचे काम करतो.
 
* मुलतानी माती पाण्यामध्ये टाकून तिची पेस्ट बनवा. नंतर ती चेहऱ्यावर लावा. मुलतानी मातीला दह्यात मिसळूनही लावू शकतो. मुरमांवर हाही एक जालीम उपाय आहे.
 
* गरम पाण्यात हळद टाकून वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील छिद्रे खुली होतात आणि चेहरा साफ होतो. मुरूम व्हायला त्यामुळे अटकाव होतो.
 
* तुळस व लिंबाच्या पानाची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने मुरूम होत नाही.