चेहऱ्यावर डेड स्किन आहे? मग कोरफड वापरा

तुमच्या त्वचेनुसार तुम्ही घरीच कोरफडचा फेसपॅक तयार करू शकता. हा तयार केलेला फेसपॅक चेहऱ्याला लावल्यास तुम्ही नक्कीच हॅण्डसम दिसाल.

    कोरफड प्रत्येकासाठीच खूप उपयुक्त आहे. त्वचेसंबंधी असलेल्या अनेक समस्या ती दूर करते. यामुळे चेहऱ्यावरील मृतपेशी नाहीशा होऊन त्वचा क्लिन होते. जेणेकरून तुम्ही चिरतरुण दिसता. परंतु प्रत्येकाची त्वचा वेगळ्या प्रकारची असते. यामुळे तुमच्या त्वचेनुसार असा करा कोरफडचा वापर….
    तुमच्या त्वचेनुसार तुम्ही घरीच कोरफडचा फेसपॅक तयार करू शकता. हा तयार केलेला फेसपॅक चेहऱ्याला लावल्यास तुम्ही नक्कीच हॅण्डसम दिसाल. तर मग

    जाणून घ्या, कसा करावा फेसपॅक…
    सामान्‍य त्वचा
    ज्या पुरुषांची त्वचा नॉर्मल असते त्यांना विशेष काही करण्याची आवश्यकता नसते. फक्त प्रत्येकी एक चमचा गुलाब पाणी, दही, संत्र्यांच्या सालीची पावडर आणि करोफडचा रस मिक्स करुन चेहऱ्याला लावा. आठवड्यातून एक दिवस हा पॅक लावल्यास तुमची त्वचा चमकदार होईल.

    तेलकट त्वचा
    तेलकट त्वचा असलेल्या पुरुषांनी प्रत्येकी एक चमचा काकडीचा रस, गुलाब पाणी आणि कोरफडची रस मिक्स चेहऱ्याला लावावा. यानंतर 15 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. काही दिवसात तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. हा उपाय संवेदनशील त्वचेसाठीही करू शकता.

    कोरडी त्वचा
    अनेकांची त्वचा शेविंग केल्यानंतर अधिकच कोरडी होते. यामुळे त्वचेवर ग्लो येण्यासाठी तुम्ही, प्रत्येकी एक चमचा कोरफडचा रस, लिंबाचा रस आणि मध मिक्स करुन याची पेस्ट करुन चेहऱ्याला लावा. असे नियमित केल्यास त्वचा कोमल आणि मुलायम दिसेल.