फेस सीरमने खरंच चेहरा उजळतो?; जाणून घ्या सत्य

सिरम हे असे एक द्रव्य आहे जे मलमासारखे वापरल्यास चेहरा उजळतो. त्वचेचे अनेक रोग बरे होतात. काळेपण, सुरकुत्या, पिंपल्स, मोठे डाग, त्वचेचा तेलकटपणा दूर होतो. सिरम त्वचेच्या डर्मल थरांच्या आत जातात, जिथे त्वचेला बाह्य तंतूंचा सर्वाधिक धोका असतो.

    आपल्या सगळ्यांनाच आकर्षक आणि सुंदर त्वचा हवी असते. पण बदलते हवामान, शारीरिक बदल आणि इतर अनेक गोष्टींमुळे आपली त्वचा खराब होते. त्यामुळे त्वचा चांगली होण्यासाठी आपण शेकडो क्रीम, सिरम, मॉईश्चरायझर वापरतो. अशा सौंदर्य प्रसाधनांवर आपण भरपूर खर्चही करतो. वास्तव हे आहे की चांगल्या त्वचेसाठी या साऱ्याची काहीच गरज नसते. काही चांगल्या सवयी अंगीकारल्या तर आपली त्वचा उत्तम राहते. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे फेस सिरमचा वापर करणे.

    वापर का हवा?
    सिरम हे असे एक द्रव्य आहे जे मलमासारखे वापरल्यास चेहरा उजळतो. त्वचेचे अनेक रोग बरे होतात. काळेपण, सुरकुत्या, पिंपल्स, मोठे डाग, त्वचेचा तेलकटपणा दूर होतो. सिरम त्वचेच्या डर्मल थरांच्या आत जातात, जिथे त्वचेला बाह्य तंतूंचा सर्वाधिक धोका असतो. तुम्हाला जर कोणती त्वचेची समस्या असेल तर सिरममुळे ती लगेच दूर होते. नितळ त्वचा असलेल्या महिला व्हिटामिन आणि वनस्पती असे घटक असलेले सिरम वापरू शकतात. याचेच सिरम हे एक उत्तम उदाहरण आहे.

    वापरायचे कसे ?
    उत्तम त्वचेसाठी सिरमचा वापर कसा करता हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही सिरम कसे वापरता?, पाणी किती वापरता?, या सगळ्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. चेहरा धुतल्यावर सिरम लावले जाते. सिरम चेहऱ्याला लावताना फक्त दोनच बोटांचा वापर करावा, ज्यामुळे सिरम वाया जाणार नाही. अजारा, व्या नॅचरल्स आणि रॉ रिच्युल्सचे सिरम त्वचा नितळ आणि निरोगी ठेवण्यासाठी उत्तम आहेत.

    या गोष्टींना वेळ द्या
    तुम्ही एकदा का हे सिरम रोज वापरण्यास सुरुवात केली की, लगेच त्वचा सुधारणार नाही. तुम्हाला सिरमचा नियमित वापर करावा लागेल. सिरमचा परिणाम दिसायला तुम्हाला कमीत कमी महिनाभर त्यांचा वापर करावा लागेल. सिरम किती आणि कसे वापरायचे याचा एक वेळापत्रक तयार करा. कोणते सिरम दिवसा वापरायचे, कोणते रात्री वापरायचे हे एकदा ठरवून घ्या.