फॅशन मॅक्सी टॉपची

मॅक्सी टॉप हा प्रामुख्याने पार्टी वेअर म्हणून वापरला जातो. सध्या प्रमोशनल इव्हेंड असो किंवा बर्थ डे पार्टी असो सगळीकडेच मॅक्सी टॉपची क्रेझ असलेली दिसून येते.

    बाजारात अनेक व्हरायटीमध्ये कपडे उपलब्ध असतात. दरवेळेस या टॉपमध्ये अनेकविध बदल झालेले असतात. सध्या फॅशनच्या दुनियेत मॅक्सी टॉपचे आकर्षण वाढत चालले आहे. मॅक्सी टॉप ही हटके फॅशन ट्राय करायला काहीच हरकत नाही.

    पार्टीवेअर
    मॅक्सी टॉप हा प्रामुख्याने पार्टी वेअर म्हणून वापरला जातो. सध्या प्रमोशनल इव्हेंड असो किंवा बर्थ डे पार्टी असो सगळीकडेच मॅक्सी टॉपची क्रेझ असलेली दिसून येते. स्लीट कट, दोन्हीकडून कट, शॉर्ट टू लाँग अशा वेगवेगळ्याल प्रकारामध्ये हे मॅक्सी टॉप मिळतात. गडद रंगछटामध्ये हे टॉप अधिक सुंदर दिसतात. ग्राफिक प्रिंट, जिओमेट्रिक प्रिंट, कॅनव्हास प्रिंट, ब्लॉक प्रिंट अशा अनोख्या प्रिंटचा वापर मॅक्सी टॉपसाठी करण्यात येतो.

    ट्रेंडी बनवण्यासाठी
    चेन, बटण यांचा वापर करून या टॉपला अजून ट्रेंडी बनवण्यात येते. पारदर्शक शिफॉनच्या कपड्याच वापर मॅक्सी टॉपसाठी होतो. तसेच तलम, कॉटन, शीर अशा कापडाचा वापरही टॉप बनविण्यासाठी केला जातो.