फॉर्मल लुकला द्या घड्याळाची साथ

मेटलमध्ये सध्या रोझ गोल्ड, स्टील आणि गोल्डच्या कॉम्बिनेशनची घडय़ाळे ट्रेंडमध्ये आहेत. पार्टी किंवा इनफॉर्मल कार्यक्रमांसाठी थोडी फंकी,..

    घडय़ाळ दिसायला एक साधीशी अ‍ॅक्सेसरी वाटत असली, तरी योग्य रीतीने स्टायलिंग केल्यास ती इतर सर्व अ‍ॅक्सेसरीजना पुरून उरते. फॉर्मल लुकमध्ये तर घडय़ाळ महत्त्वाची अ‍ॅक्सेसरी असते. त्यासाठी पर्यायपण पुष्कळ आहे. सध्या मोठय़ा डायलची घडय़ाळे ट्रेंडमध्ये आहेत. अगदी मेन्स कलेक्शनमधलेही एखादे मोठय़ा डायलचे घडय़ाळ ट्राय करू शकतेस. मेटल किंवा लेदर स्ट्रॅप, सिंपल डायलची घडय़ाळे तुला ऑफिसमध्ये वापरता येतील. बेसिक काळ्या किंवा सफेद रंगाऐवजी नेव्ही, हिरवा, मरून, मस्टड यलो रंगाचे स्ट्रॅप वापरून पाहा.

    मेटलमध्ये सध्या रोझ गोल्ड, स्टील आणि गोल्डच्या कॉम्बिनेशनची घडय़ाळे ट्रेंडमध्ये आहेत. पार्टी किंवा इनफॉर्मल कार्यक्रमांसाठी थोडी फंकी, एक्स्पिरीमेंटल घडय़ाळे ट्राय करायला हरकत नाही. लहान डायलचे घडय़ाळ कडे किंवा ब्रेसलेटसोबत पेअर करता येऊ  शकते. सध्या हा फुल ट्रेंडमध्ये आहे. त्याच्यासोबतसुद्धा घडय़ाळ घालू शकतेस. घडय़ाळासोबत अंगठीची जोडी हिट आहे. वेगवेगळ्या आकाराच्या; पण एकाच रंगाच्या अंगठय़ा आणि त्याच रंगाचे घडय़ाळ घालू शकतेस. एकाच वेळी दोन वेगवेगळी घडय़ाळेसुद्धा घालून बघ. लुकला ट्विस्ट मिळतो.