वेस्टर्न कपड्यावर लावा क्लासिक कुंकू

  आपल्या भारत देशात कुंकवाला प्राचीन कालावधीपासून वेगळेच महत्त्व आहे. दाम्पत्य जीवन जगणारी स्त्री असो वा कुणीही कन्या असो तिच्या कपाळावर कुंकवाचा टिळा वा टिकली, गंधक लावले जाते. सौभाग्यवती स्त्री ही कुंकू हे सौभाग्याचे लेणे समजते.

  विवाहित स्त्रीची कुंकू, मंगळसूत्र आणि चुडा ही एक ओळख असते. पण आधुनिक बदललेल्या जीवनशैलीत स्त्रियांना लग्नानंतर कपाळी कुंकू लावणे आणि मंगळसूत्र वापरणे, चुडा घालणे म्हणजे मागासलेले लक्षण समजले जाते. कारण लग्नानंतर त्या आपल्या जुन्या लाईफस्टाईलनुसारच जगणे पसंत करतात. काही स्त्रियांना वाटते की, पाश्चिमात्य कपडय़ांवर कुंकू चांगले दिसत नाही. पण हा समज चुकीचा आहे, असे म्हटले जाते. पाश्चिमात्य कपडय़ांवर कुंकू लावल्यास ते छान दिसते आणि तो सध्याचा ट्रेंडसुद्धा आहे. खाली दिलेल्या पाश्चिमात्य कपडय़ांसोबत तुम्हीसुद्धा कुंकू लावल्यास तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडेल. तो सध्या ट्रेंडही आहे.

  जॅकेटसोबत..
  या ड्रेसवर कुंकू लावल्यावर किती सुंदर आणि स्मार्ट लूक येतो. कारण काही स्त्रियांना लग्नानंतर वर्षभर कुंकू, चुडा आणि मंगळसूत्र घालणे अनिवार्य असते.

  ऑफिस लूक
  इथे तुम्ही पाहू शकता की, या महिलेने एक मोठीशी टिकली लावली आहे. यामुळे तिला एक इंडो वेस्टर्न लूक मिळालाय.

  इंडो वेस्टर्न लूक
  अशा प्रकारच्या ड्रेसवरसुद्धा तुम्ही कुंकू लावू शकता, जो तुमच्यावर फारच शोभून दिसेल. कारण तो तुम्हाला एक पूर्णपणे रॉयल असा लूक देतो.