ऑईली स्किनसाठी ‘या’ आहेत मेकअप टिप्स

कंसीलर आणि फाऊंडेशन लावल्यानंतर मेकअपवर ट्रांसलुसेंट पावडर लावा. यामुळे मेकअप खूप वे‌ळापर्यंत टिकून राहील.  

  बऱ्याचदा मेकअप केल्यानंतर आपल्याला हवा असलेला ग्लो चेहऱ्यावर दिसत नाही. त्यासाठीच नेहमी आपल्या स्किन टाईपनुसार मेकअप करणे गरजेचे आहे. अशी समस्या खासकरून ऑईली स्किनसोबत जास्त असते. खास ऑईली स्किनसाठी काही टीप्स देण्यात आलेल्या आहेत. मेकअप करण्याअगोदर हे नक्की फॉलो करा.

  मेकअप करण्याअगोदर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. शक्य असल्यास हल्का स्क्रब करा. यामुळे ब्लॅक हेड् निघून जातील. नंतर माईल्ड टोनरने चेहरा साफ करा. टोनर चेहऱ्यावर असलेल्या तेलाला सोकून घेण्याचे काम करतो.
  ऑईली स्किन असेल तर ऑईल फ्री फाऊंडेशन वापरा. हे त्वचेत दिसणाऱ्या रोम छिद्रांना भरून टाकते त्यामुळे चेहरा एकसमान दिसतो.  फाऊंडेशन लावण्याअगोदर चेहऱ्याला बर्फ लावा.

  ऑईली त्वचा असेल तर त्वचेवरील, डाग, मुरूम मेकअपदरम्यान दिसून येतात. त्यामुळे अगोदर कंसीलर लावण्यास विसरू नका.

  तर खुलेल तुमचे सौंदर्य
  कंसीलर आणि फाऊंडेशन लावल्यानंतर मेकअपवर ट्रांसलुसेंट पावडर लावा. यामुळे मेकअप खूप वे‌ळापर्यंत टिकून राहील.
  दिवसभर बाहेर असल्यामुळे फक्त थकवाच येत नाही तर त्वचाही खराब होते. तुम्ही थकल्याने अनेक कामे करण्याचे टाळता. परंतु यामुळे सौंदर्याच्या समस्या निर्माण होतात. यासाठी या काही गोष्टी अवश्य करा.

  – रात्री झोपण्यापूर्वी थंड पाण्याने आंघोळ करा. यामुळे तुमचा दिवसभराचा थकवा निघून जाईल आणि रक्ताभिसरणही योग्य पद्धतीने होईल. यामुळे सकाळी त्वचा फ्रेश दिसेल.

  – डोळ्यांच्या आसपासची त्वचा खूप नाजुक असते. यामुळे रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांभोवती कॅफिनयुक्त आय क्रिम अथवा फेस मसाज क्रिम लावा.

  – रात्री त्वचा स्वच्छ असेल तर पुरळ, मुरुम यांसारख्या समस्या निर्माण होणार नाही. चेहऱ्याचा मेकअप काढून फक्त मॉश्चराईजर लाऊन झोपा.

  – त्वचेची काळजी घेताना पायाकडे दुर्लक्ष करू नका. दिवसभराच्या कामामुळे पाय दुखतात तसेच त्याची त्वचाही खराब होते. यामुळे झोपण्यापूर्वी लोशन अथवा फुट केअर क्रिम लावा.

  – हळदीचे दूध पिल्याने चांगली झोप येते. यामुळे शरीरातील विषाण्ण पदार्थ बाहेर पडतात. रोज असे दूध पिण्यामुळे नक्कीच त्वचा उजळेल.

  – दिवसभर केसांना धूळ, माती, प्रदूषण या सारख्या अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. यामुळे रात्री झोपताना तेलाने छान मसाज करा.