rava face scrub

रव्याचा एक खास स्क्रब (Scrub) वापरून तुम्ही त्वचेच्या समस्यांपासून सुटका करुन घेऊ शकता. जाणून घेऊयात या रव्याच्या(Homemade scrub) स्क्रबविषयी.

  उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये(Summer Days) त्वचेची खास काळजी(Skin Care) घ्यायला हवी. ऊन आणि घाम यामुळे स्किन डल होते. ब्लॅकहेड्स,टॅनिंग, पुरळ, मुरमं, पिगमेंटेशन अशा समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. या चेहऱ्याच्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी महिला काही घरगुती उपाय ट्राय करत असतात. मात्र काही उपायांचा फायदा होतो तर काही उपायांनी काहीच उपयोग होत नाही. अशात रव्याचा एक खास स्क्रब (Scrub) वापरून तुम्ही त्वचेच्या समस्यांपासून सुटका करुन घेऊ शकता. जाणून घेऊयात या रव्याच्या स्क्रबविषयी.


  रव्याचा फेस स्क्रब बनवण्याची पद्धत

  • रवा – ४ चमचे
  • दही -३ चमचे
  • मुगडाळीची पावडर – १ चमचा
  • गुलाबपाणी – १ चमचा

  फेसस्क्रब बनवण्याची पद्धत

  एका वाटीमध्ये रवा ठेवा. रव्यामध्ये दही मिक्स करुन हे मिश्रण ५ मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर या पेस्टमध्ये मुगडाळीची पावडर, गुलाबपाणी मिसळा. सगळं व्यवस्थित एकत्र करुन घ्या. तुमचा रव्याचा स्क्रब तयार. हा स्क्रब लावण्याआधी चेहरा स्वच्छ करुन घ्या. चेहऱ्यावर स्क्रब लावा. हलक्या हातांनी हे स्क्रब चेहऱ्यावर थोडासा दाब देत पसरवून घ्या.साधारण २० ते३० मिनिटे हे स्क्रब चेहऱ्याला लावून ठेवा.थोड्या वेळाने चेहऱ्याला ओल करुन थोडंस घासून फेस स्क्रब पाण्याने धुवून टाका.