उन्हाळ्यात वाढतात त्वचेच्या समस्या, अशी घ्या काळजी

उन्हाळ्यामध्ये घाम येणे, त्वचा लाल होणे, त्वचा काळवंडणे किंवा टॅनिंगची समस्या जाणवायला लागते. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेकडे व्यवस्थित लक्ष द्या.(how to take care of your skin in summer) उन्हाळ्याच्या मोसमात त्वचेची काळजी कशी घेता येईल, हे आपण जाणून घेऊयात.

  उन्हाळ्यामध्ये त्वचेची देखभाल करणं (how to take car of skin in summer)जास्त गरजेचं असतं. कारण उन्हाळ्यामध्ये घाम येणे, त्वचा लाल होणे, त्वचा काळवंडणे किंवा टॅनिंगची समस्या जाणवायला लागते. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेकडे व्यवस्थित लक्ष द्या. उन्हाळ्याच्या मोसमात त्वचेची काळजी कशी घेता येईल, हे आपण जाणून घेऊयात.

  • उन्हाळ्यात सनस्क्रीमचा वापर नक्की करा. सनस्क्रीममुळे चेहऱ्यावरील डाग आणि टॅनिंगच्या समस्येपासून सुटका होते. घरातून बाहेर पडाल तेव्हा ॲलर्जी, टॅनिंग किंवा उन्हामध्ये त्वचा लाल होण्याची समस्या जाणवू शकते. त्यामुळे बॅगेत सनस्क्रीम नेहमी ठेवा.
  • कोरोना अजुनही पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे बॅगेत सॅनिटायझर असायलाच हवे. यामुळे कोरोनापासून बचाव होईल आणि हातावरची त्वचा स्वच्छ राहील.
  • उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट करण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. नेहमी स्वत:जवळ एक पाण्याची बाटली ठेवा. त्यामुळे घशाला कोरड पडणार नाही. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही.
  • ‌ उन्हाळ्यात शरीराला घाम येत असल्याने शरीराला एक प्रकारचा वास यायला लागतो. त्यामुळे नेहमी परफ्युम किंवा डिओड्रंट सोबत ठेवा आणि गरज असेल त्यावेळी वापरा.
  • उन्हामध्ये बाहेर जाताना स्कार्फ आणि सनग्लासेस वापरा. यामुळे उन्हापासून तुमच्या त्वचेचा बचाव होतो.
  • उन्हाळ्यात वेट वाईप्स वापरणे खूप चांगला पर्याय आहे. नेहमी बाहेर जाताना वेट वाईप्स सोबत ठेवा.
   या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात तर उन्हाळ्यात तुमची त्वचा चांगली राहू शकते.