त्वचेची अति काळजी घेणाऱ्यांनो हे नक्की वाचा!

. मेकअपसाठी चांगल्या दर्जाची उत्पादने वापरणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. स्वस्त मिळतात म्हणून डुप्लिकेट किंवा निकृष्ट दर्जाची उत्पादने वापरली तर त्वचेला हमखास त्रास होतो.

    प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसायला आवडते. चांगले स्वच्छ कपडे, सुंदर चेहरा व नितळ त्वचा असलेली व्यक्ती समोरच्यावर चांगली छाप पाडू शकते. पण प्रत्येकालाच जन्मजात सौंदर्य मिळालेलं नाहीये. म्हणूनच अनेक लोक आपले असलेले रूप छान दिसण्यासाठी मेकअपचा पर्याय निवडतात. मेकअप माफक प्रमाणात व योग्य प्रकारे केला तर त्याने व्यक्तिमत्व उठून दिसते. पण अतिभडक मेकअप किंवा न शोभणारा मेकअप केला तर व्यक्ती सुंदर दिसण्याऐवजी विचित्र दिसू लागते. मेकअप करण्याचीही एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. मेकअप करताना काय करावे व काय करू नये ह्याचेही काही नियम आहेत.

    ते पाळले नाहीत तर तुमच्या रूपावर व त्वचेवर सुद्धा वाईट परिणाम होऊ शकतात. मेकअपसाठी चांगल्या दर्जाची उत्पादने वापरणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. स्वस्त मिळतात म्हणून डुप्लिकेट किंवा निकृष्ट दर्जाची उत्पादने वापरली तर त्वचेला हमखास त्रास होतो. मेकअपची आवड असणाऱ्या अनेक मुली अश्याच काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात व आपली त्वचा खराब करून घेतात. आज आपण जाणून घेणार आहोत की, मेकअप करताना कुठल्या गोष्टी टाळणे आवश्यक आहे.

    १. खूप जास्त प्रमाणात कन्सिलर वापरणे

    प्रत्येक मुलीला वाटतं की, आपली त्वचा सुंदर व नितळ दिसावी. म्हणून मेकअप करताना डाग किंवा चेहेऱ्यावरील खड्डे दिसू नये म्हणून खूप जास्त प्रमाणात कन्सिलरचा वापर करतात. कन्सिलरची चुकीची शेड सिलेक्ट केली तर चेहेरा व मान ह्यात रंगाचा फरक पटकन दिसून येतो व ते दिसायला अतिशय विचित्र दिसते. तसेच चेहेऱ्यावर कन्सिलरचा अतिशय जाड थर लावल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या आल्यासारखे दिसते व त्यामुळे तुमचे वय जास्त दिसते.

    ३.लिपस्टिकची चुकीची शेड निवडणे

    चांगल्या लिपस्टिकमुळे चेहेरा सुंदर दिसतो ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. रिच सॅच्युरिटेड रंगाच्या शेड्स ट्राय करायला काहीच हरकत नाही. पण तुमचे ओठ जर बारीक व लहान आकाराचे असतील तर तुम्हाला डार्क शेडचे लिपस्टिक चांगले दिसणार नाही कारण डार्क रंगाच्या लिपस्टिक मुळे ओठ बारीक दिसतात. तुमचे ओठ बारीक असतील तर लिपस्टिकच्या मदतीने तुम्ही ते सुंदर बनवू शकता. योग्य शेडचे लिपस्टिक व नॅचरल लीप लाईनच्या थोडी बाहेरून लीप लाईन काढली तर ओठ मोठे दिसू शकतात.

    ४. डार्क आयशॅडो चुकीच्या पद्धतीने लावणे

    आयशॅडो लावताना ती संपूर्ण पापणीला लावू नका. ह्याने तुमचे वय जास्त दिसू शकेल. पापणीच्या फक्त बाहेरच्या कडांना आयशॅडो लावावी ह्याने तुमचे डोळे उठून दिसतात.

    ६. गालांना ब्लश लावणे

    डार्क शेडचे ब्लश आता आऊट ऑफ फॅशन आहेत. सध्या ट्रेंडमध्ये लाईट शेड्स आहेत. पेल पिंक किंवा पिच कलरच्या ब्लशची सध्या फॅशन आहे. ब्लश लावताना गालाच्या वरच्या भागावर फोकस करा. ह्याने चेहेऱ्याचा आकार चांगला दिसतो. गालाच्या मध्यभागी ब्लश लावले तर चेहरा गोल व फुगीर दिसतो. चीकबोन्स हायलाईट केल्याने चेहेरा मॅच्युअर्ड व प्रमाणबद्ध दिसतो. मेलो आणि नॅचरल टोन वापरल्याने तुम्ही यंग दिसता व तुमच्या चेहऱ्यावर एक रोमँटिक ग्लो येतो.

    ७. भुवया जास्त हायलाईट करणे

    डार्क रंगाने भुवया जास्त हायलाईट केल्याने चेहेरा विचित्र दिसू शकतो. तसेच वय सुद्धा जास्त दिसते. तुमच्या भुवयांच्या नैसर्गिक रंगापेक्षा एक शेड लाईट घ्या म्हणजे तुमचा चेहरा सुंदर दिसण्यात मदत होईल.

    १०. चेहऱ्यावर खूप जास्त पावडर लावणे

    चेहऱ्यावरचे डाग तसेच तेलकटपणा घालवण्यासाठी पावडर अतिशय उपयुक्त आहे पण ती योग्य प्रमाणात लावली तरच! जास्त पावडर लावल्याने चेहरा ड्राय दिसतो. डोळ्यांभोवती पावडर लावणे टाळा कारण त्या ठिकाणी जास्त प्रमाणात पावडर लावल्यास डोळ्यांभोवती सुरकुत्या दिसतात. तसेच मेकअप करण्याआधी चेहेरा चांगला स्वच्छ धुवून घ्यायला हवा. मेकअप करताना लॉंग लास्टिंग व वॉटरप्रूफ उत्पादने वापरली तर तुमचा मेकअप दिवसभर चांगला टिकेल. वॉटरप्रूफ उत्पादने वापरली तर तुमचा आय मेकअप खराब होणार नाही.