तरुण दिसण्यासाठी अशी करा कपड्यांची निवड

वय हा फक्त आकडा असला तरी त्यामुळे अनेक गोष्टी बिघडू शकतात. नेहमी तरुण दिसण्यासाठी हे उपाय करून बघा.

    चिरतरुण दिसणे प्रत्येकालाच आवडते. आपल्या अस्सल वयापेक्षा कमी वयाचे आपण दिसावे असे प्रत्येकाला वाटते. वय हा फक्त आकडा असला तरी त्यामुळे अनेक गोष्टी बिघडू शकतात. नेहमी तरुण दिसण्यासाठी हे उपाय करून बघा.

    अँकल लेंथ बूट – तुमचे वय कितीही असो. अँकलपासून काही इंच वर असलेले बूट घातल्यावर तुम्ही अधिक तरुण दिसाल.

    ओव्हरसाईझ स्वेटर – ओव्हरसाईझ कपडे यूथफुल दिसतात. त्यातच काळा रंग त्यात आणखी भर पाडतो. प्रिंटेड लेगिंग, स्किनी जीन्स यांच्यासोबत हे अगदी मस्त दिसेल.

    स्ट्रेची पॅन्ट – स्ट्रेट किंवा नॅरो लेग असलेली फ्लॅट फ्रंट पॅन्ट अगदी उत्तम चॉईस आहे.

    टी-शर्ट – तुमच्याजवळ वेळ नसेल तर वेगवेगळे प्रयोग करत बसण्याऐवजी टी-शर्ट उत्तम उपाय आहे. आता उन्हाळा सुरू होणार असल्याने पांढरा, करडा, पिवळा असे सॉफ्ट शेड वापरा.