‘लेस’नी वाढवा ‘ग्रेस’; आजमावा नवा फॅशन ट्रेंड

एरवी बुटांमध्ये वापरण्यात येणाऱ्या या नाड्या टॉप्सवर कल्पकपणे सजवून मिरवणं ही क्रेझ तरुणींमध्ये दिसून येतेय. विशेषतः क्रॉप टॉप्सवर या शू लेस अधिक उठून दिसतात.

    सध्या मार्केटमध्ये दिसत असलेला असाच एक हटके ट्रेंड म्हणजे ‘शू लेस टॉप्स’. एरवी बुटांमध्ये वापरण्यात येणाऱ्या या नाड्या टॉप्सवर कल्पकपणे सजवून मिरवणं ही क्रेझ तरुणींमध्ये दिसून येतेय. नेहमीच्या फॅशन्सबरोबर हटके काहीतरी करायला तरुणाई नेहमीच उत्सुक असते. सध्या मार्केटमध्ये दिसत असलेला असाच एक हटके ट्रेंड म्हणजे ‘शू लेस टॉप्स’.

    एरवी बुटांमध्ये वापरण्यात येणाऱ्या या नाड्या टॉप्सवर कल्पकपणे सजवून मिरवणं ही क्रेझ तरुणींमध्ये दिसून येतेय. विशेषतः क्रॉप टॉप्सवर या शू लेस अधिक उठून दिसतात. टॉपच्या गळ्याभोवती किंवा टॉपच्या स्लिव्हसवर या नाड्या आकर्षकपणे बांधल्या जातात. गडाद रंगाच्या टॉपवर पांढऱ्या रंगाची लेस तर फिकट रंगाच्या टॉप्सवर गडद रंगाच्या लेस लावल्या जातात. पांढऱ्या काळ्या रंगांच्या या नाड्यांबरोबरच फ्लुरोसंट लेसही सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. ब्राईट रंगसंगती असलेल्या टॉप्सवर एखादा छानसा संदेश आणि त्याच्या जोडीला पुढे दोन्ही बाजूंनी लेस हा सध्या फॅशनचा हमखास ‘इन’ फॉर्म्युला झाला आहे. त्याचबरोबर टॉपच्या मागच्या बाजूला या लेसची फॅशन करतानाही अनेकजणी दिसून येतात. डेनिम शर्ट आणि शिफॉन शर्टस किंवा टॉप्सवरही ही शू लेसची फॅशन उठून दिसते.

    टॉप्सबरोबर फ्रेशर्स पार्टीसाठी एखाद्या वन पीसवरही आकर्षकरित्या या शू लेस लावून तुम्ही इतरांचं लक्ष वेधून घेऊ शकता. शू लेस टॉप्सबरोबर जास्त दागिने घालणं मात्र टाळा. हा लेस टॉप तुमचा पूर्ण लूक बदलून टाकू शकतो. त्यामुळे त्याच्याबरोबर इतर लूक साधा ठेवा. या टॉपखाली जीन्सची पँट डेनिम शॉर्टस किंवा फंकी प्लाझो पँट्सही घालू शकता. कूल आणि स्पोर्टी लूकसाठी ही लेस फॅशन करण्याकडे तरुणाईचा ओढा वाढत आहे.