स्कर्ट घालायला आवडतं?; मग असा निवडा परफेक्ट स्कर्ट

उंची कमी असेल तर हाय वेस्ट लाईन स्कर्ट घाला. गुडघ्यापर्यंत लांब असणारा स्कर्टही वापरू शकता. यामुळे तुमची उंची जास्त असल्याचे दिसेल.

  स्कर्ट घालणे प्रत्येक मुलीला आवडते. स्कर्ट निवडताना आपल्या शरीराची ठेवण कशी आहे, याकडे लक्ष दिले तर तुम्ही स्कर्टमध्ये अधिक सुंदर दिसाल. आपल्या शरीराच्या ठेवणीनुसार स्कर्ट निवडण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा –

  जाड आणि कमी उंची
  जर तुमची उंची कमी आहे आणि शरीरबांधा जाड असेल तर फ्लोई प्रकारचा स्कर्ट वापरा. शरीराचा अॅपल शेप असणाऱ्यांनी अवश्य या स्कर्टची निवड करावी.

  सडपातळ शरीर
  तुमचा शरीरबांधा सडपातळ असेल तर तुम्ही आखूड आणि गुडघ्यापर्यंत लांब असलेले स्कर्ट वापरू शकता. यामुळे तुम्हाला हटके आणि स्टायलिश लूक मिळेल.

  कमी उंची
  उंची कमी असेल तर हाय वेस्ट लाईन स्कर्ट घाला. गुडघ्यापर्यंत लांब असणारा स्कर्टही वापरू शकता. यामुळे तुमची उंची जास्त असल्याचे दिसेल.

  जास्त उंची
  उंची खूप जास्त असलेल्या मुलींना लॉग स्कर्ट वापरणे सोयीस्कर ठरते. यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळाच लूक मिळतो.