oily hair

ऑयली केसांच्या समस्येपासून(Oily Hair) सुटका मिळवण्यासाठीचे काही उपाय आपण जाणून घेणार आहोत.

    उन्हाळ्यात  आरोग्याच्या,त्वचेच्या आणि केसांच्या समस्या डोकं वर काढतात. उन्हाळ्यात केस चिकट आणि तेलकट (Oily Hair Problem) होण्याची समस्या वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेबरोबर केसांचीही काळजी घ्यायला हवी.

    केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी (Healthy Hair) त्यांना मुळापासून पोषण (Nutrition) मिळायला हवं. त्यासाठी चांगली उत्पादने (Quality Product) वापरा.   काहीवेळा घरगुती उपायही फायद्याचे असतात. मात्र तुमच्या केसांना काय सुट होतय ते बघूनच काय ते करा.ऑयली केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठीचे काही उपाय आपण जाणून घेणार आहोत.

    इसेन्शियल ऑईल

    केसांना शॅम्पू लावण्याआधी केसांना इसेन्शियल ऑईल (Essential Oil) लावावं. एक मोठा चमचा पाण्यात १० थेंब इसेंशियल ऑईल टाका. हे मिश्रण  एकत्र करा. बोटांच्या मदतीने  टाळूला लावा आणि थोड्या वेळाने शॅम्पू करा.

    नारळाचं तेल

    नारळाचं तेल (Coconut Oil) लावण्याने केसांना फायदा होतो. त्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात. नारळाचं तेल आणि लिंबू रस एकत्र करा. त्यात ४ ते ५ चमचे लवेंडर ऑईल टाका. केसांना हळूवारपणे लावा. ४ ते ५ तसांनी पाण्याने धुवा.

    ॲपल सायडर व्हिनेगर

    केसांना शॅम्पू लावल्यानंतर ॲपल सायडर व्हिनेगरने (Apple Cider Vinegar) धुवा. केस धुतल्यानंतर पाण्यात ॲपल सायडर व्हिनेगर मिक्स करा. हे पाणी केसांवर टाका. यामुळे केसांचा तेलकटपणा कमी होऊन केस चमकदार होतील.

    शॅम्पू

    ऑयली केस धुवताना शॅम्पूचाही योग्य प्रकारे वापर करावा. जास्त शॅम्पू वापरल्यानेही केसांना हानी पोहोचते. शॅम्पू केसांच्या वरच्या भागात लाऊन कंगव्याने पसरवा. त्यामुळे तुमचे केस ऑयली होणार नाहीत. यासाठी ऑईल कंट्रोल शॅम्पूचा वापर करावा.

    कंडिशनर

    ऑयली केसांना कंडिशनर (Conditioner) लाऊ नये असं सांगितलं जातं. मात्र ऑयली केसांसाठीही कंडीशनर लावायला हवं. पण, कंडीशनर केसांच्या मुळांना न लावता केवळ खालच्या भागाला लावावं. माईल्ड कंडीशनर वापरणं चांगलं. मात्र, केस ऑयली होत असतील तर, हेअर मास्क लाऊ नयेत.

    कंगव्याचा वापर

    ऑयली केसांना सतत विंचरू नये. कारण त्यामुळे केसांमध्ये जास्त प्रमाणात सीबम वाढतं. पण, केसांमधला गुंता योग्य पद्धतीने काढायलाही हवा. त्यामुळे केसांसाठी हेअर ब्रश वापरून केस मोकळे करावेत. मात्र, जास्त वेळा हेअर ब्रशही वापरु नये.