फुटवेअरची ऑनलाईन खरेदी करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

फुटवेअर खरेदी करताना आधी त्याचा सॉफ्टनेस पडताळून पाहा. केवळ पायात सुंदर दिसताहेत किंवा डिझाइन छान आहे, म्हणून फुटवेअर निवडू नका.

  एखाद वेळेस ड्रेसवर मॅचिंग अॅक्सेसरीज नसली तरी चालते पण जर फुटवेअर्स कम्फर्टेबल नसतील तर मात्र एक एक पाऊल टाकणं अवघड होतं. वेळ वाचविण्यासाठी फुटवेअरची ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर कोणती काळजी घ्याल

  – फुटवेअर खरेदी करताना आधी त्याचा सॉफ्टनेस पडताळून पाहा. केवळ पायात सुंदर दिसताहेत किंवा डिझाइन छान आहे, म्हणून फुटवेअर निवडू नका. ते पायात घालून चालताना कम्फर्टेबल आहेत का ते पडताळा.

  – जर शू किंवा स्लीपर्स ऑनलाइन खरेदी करत असाल, तर योग्य साइजच निवडा. खरंतर प्रत्येक ब्रॅण्डचा साइज हा दुसऱ्यापेक्षा वेगळाच असतो. शिवाय दुसऱ्या देशातील कंपनीचा फुटवेअर साइजही वेगळा असतो. अशावेळी फुटवेअरच्या अधिकच्या माहितीत (डिस्क्रिप्शन) त्यासंबंधी ब्रॅण्डने दिलेल्या फुटवेअरच्या मापाच्या गाइडलाइन्स नक्की तपासा…

  – ऑनलाइन फुटवेअर खरेदी करताना एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा की, प्रत्येक कंपनीची पॉलिसी वेगळी असते. अशावेळी ऑर्डर करण्यापूर्वी आधी चेक करा की कंपनी तुम्हाला एक्सचेंजची किंवा वस्तू परत घेण्याची ऑफर देत आहे का?

  – पायाच्या साइजनुसारच फुटवेअर साजेशा दिसतात. फुटवेअरच्या सततच्या शॉपिंगने तेवढा अंदाज आपल्याला आलेलाच असतो. त्यामुळे ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर पुन्हा परत किंवा एक्सेंजच्या समस्येपासून दूर राहता येईल..

  – जर फुटवेअरमध्ये एखादा नवा ब्रॅण्ड ट्राय करत असाल तर प्रथम एकच जोड ऑर्डर करा. आणि त्या ब्रॅण्डच्या फुटवेअरचा कम्फर्टनेस तपासून योग्य वाटला तरच दुसरे जोड ऑर्डर करा.

  – घरातच किंवा स्वच्छ फर्शीवरच नवे फुटवेअर ट्राय करून पाहा. जर ते आवडले नाही तर ते परत नेण्यासाठी सेल्यमन येईपर्यंत फुटवेअरच्या सुरक्षेची आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. त्यामुळे परत देताना कोणताही त्रास होणार नाही.