म्हणून स्त्रियांनी घालावे पैंजण; जाणून घ्या शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण

पैंजण घातल्याने पाय तर सुंदर दिसतातच सोबतच हे शरीरासाठीही उपायकारक आहेत. पैंजणांचा आवाज नकारात्मक ऊर्जा दूर करतो.

  पैंजण स्त्रियांच्या सोळा श्रुंगारांपैकी एक आहेत. पैंजण पायाचे सौंदर्य वाढवतात. पैंजणांचा छुमछुम आवाज सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो. पैंजण घालण्याची अनेक पारंपारिक कारणे मोठी माणसे सांगत असली तरी या पैंजणांमुळे आरोग्यसंबंधित लाभही होतात हे मात्र निश्चित आहे.

  शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते
  पैंजण नेहमी चांदीचे घालावे. काही स्त्रिया सोन्याचे पैंजण घालतात. परंतु ते आरोग्यासाठी चांगले नाही. सोने उष्णता वाढवणारे असते. चांदी शीतलता प्रदान करते.

  पायाचे सौंदर्य वाढवते
  पायाची सुंदरता वाढवण्यासाठी पूर्वीपासून स्त्रिया पायात पैंजण घालत आलेल्या आहेत. पैंजणांचा आवाज सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. म्हणूनच पैंजण स्त्रियांच्या सोळा श्रुंगारापैकी एक आहेत.

  आरोग्यासाठी लाभदायक
  पैंजण घातल्याने पाय तर सुंदर दिसतातच सोबतच हे शरीरासाठीही उपायकारक आहेत. पैंजणांचा आवाज नकारात्मक ऊर्जा दूर करतो. पैंजण सतत पायाला घासले गेल्यामुळे त्यातील धातूतत्व शरीरात जाऊन हाडे मजबूत होतात.

  पुरुषांना सतर्क करणे
  पूर्वीच्या काळी प्रत्येक स्त्री पैंजण घालत असे. त्यांच्या पायाच्या आवाजाने स्त्री येत असल्याची चाहूल लागून पुरुष सतर्क होत असत. कारण काहीही असले तरी अजूनही पैंजण फॅशनचा एक भाग बनून टिकून आहेत.