one piece

रदार असलेल्या लॉंग वनपीस वर हाय हिल्स उठून दिसतात. अनेकवेळा असे ड्रेस आपल्याला फॅशन शोमध्येही पहावयास मिळतात. तर या ड्रेसमध्ये पर्सनॅलिटी उठून दिसते. उंच असलेल्या मुलींना अशा प्रकराचा ड्रेस चांगला दिसतो.

सध्या पार्टी असो की आउटिंग वनपीस ड्रेसची फॅशन सर्वत्र पहावयास मिळते. हा ड्रेस घातल्यावर लूकही चांगला येतो आणि कंम्फर्टही वाटते. वनपिस ड्रेसमध्ये फुल स्लिव्हज, वन फोर्थ स्लीव्ह किंवा स्लिव्हलेज असे प्रकार पहावयास मिळतात. हे ड्रेस शॉर्ट तसेच लॉंगही पहावयास मिळतात. नेट, सॅटिन, कॉटन, शिफॉन आदी कापडांमध्ये हे ड्रेस शिवले जातात. त्यामध्ये कोणताही रंग उठून दिसतो. परंतु काळा, डार्क जांभळा, लाल, फेंट गुलाबी, लवेंडर या कलरनां मागणी आहे. लॉंग ड्रेस हा सॅटिन, नेट आणि शिफॉन या कपड्यामध्ये तयार केला जातो.

त्याला एक सुंदरसे फुल किंवा बेल्ट तयार केला जातो त्यामुळे ड्रेसची शोभा आणखीन वाढते. कॉटन प्रकारातील ड्रेस हे फुल स्लिव्ह असलेले चांगले दिसतात. तर त्याचा अम्रेला कमी ठेऊन तो ड्रेस शॉर्ट शिवल्यास चांगला दिसता. त्याला कॉलर किंवा मग त्यानर अपोझीट कलरचा सॅटिनचा बेल्ट किंवा फुल चांगले दिसते. घेरदार असलेल्या लॉंग वनपीस वर हाय हिल्स उठून दिसतात. अनेकवेळा असे ड्रेस आपल्याला फॅशन शोमध्येही पहावयास मिळतात. तर या ड्रेसमध्ये पर्सनॅलिटी उठून दिसते. उंच असलेल्या मुलींना अशा प्रकराचा ड्रेस चांगला दिसतो.

तर ड्रेसचा अम्रेला मोठा असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष वेघले जाते. या ड्रेसवर मॅचिंग पर्स घेतल्यास खुप सुंदर दिसते. तर शॉर्ट वनपीस दोन कलरमध्ये शिवता येतो. त्याला घेर जास्त नसल्याने तो व्यवस्थीत फिटिंग करूनच वापरावा. त्या रंगाची पर्स आणि हेअर बेल्ट घालावा. या ड्रेसला आकर्षक लेस वापरल्यास ड्रेसचा लूक चांगला दिसतो. असे ड्रेस घालण्यासाठी खूप कम्फर्टेबल असतात. वनपीस ड्रेस खरेदी करण्यामध्ये महाविद्यालयीन तरूणींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. थोड्या जाड तरुणींना मोठा प्रश्‍न असतो की असे ड्रेस घालायचे कसे परंतु ड्रेस निवडता त्या पध्दतीचा निवडल्यास छान दिसतो. त्यामध्ये तब्येतही कमी दिसते.