यंदाच्या पावसाळ्यात वापरा स्टायलिश रेनकोट

रेनकोटला मळकट, बोरिंग रंगाचे आवरण समजण्याचे दिवस गेले. आता आकर्षक रंग व स्टाईलचे रेनकोट बाजारात आले आहेत.  गुलाबी, पिवळा, निळा, हिरवा, केशरी, लाल अशा फ्रेश प्लेन..

    पाऊस एन्जॉय करणे सगळ्यांनाच आवडते. परंतु जेव्हा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचे असते तेव्हा पाऊस नकोसा वाटतो. पावसात बाहेर पडताना कपडे खराब होण्याची भीती सतत वाटत असते. पावसामुळे शाळा, कॉलेज किंवा ऑफिसची वेळ तर बदलता येणे शक्‍य नाही. अशा वेळी मूड खराब करण्यापेक्षा अंगावर स्टायलिश रेनकोट चढवून आनंदाने पाऊस एन्जॉय करा. रेनकोट तुमची स्मार्ट दिसण्याची इच्छा पूर्ण करून पावसापासून रक्षणही करेल.

    रेनकोटला मळकट, बोरिंग रंगाचे आवरण समजण्याचे दिवस गेले. आता आकर्षक रंग व स्टाईलचे रेनकोट बाजारात आले आहेत.  गुलाबी, पिवळा, निळा, हिरवा, केशरी, लाल अशा फ्रेश प्लेन कलर्सपासून फ्लोरल प्रिंटपर्यंत अनेक पर्याय रेनकोटमध्ये उपलब्ध आहेत. शॉर्ट किंवा लॉन्ग हवा तसा रेनकोट तुम्ही खरेदी करू शकता. यासोबतच बटण व चेन असे पर्यायही निवडू शकता.