टॅटू काढायचा आहे? मग आधी ‘हे’ वाचा

टॅटू काढून झाल्यानंतर यावर येणारी खपली काढून टाकावीशी वाटते. मात्र असे केल्याने रंगाची गुणवत्ता कमी होते.

  टॅटू हे स्टाईल स्टेटमेंट खूपच लोकप्रिय होत आहे. हे काढणे कितीही वेदनादायक असले तरी टॅटू प्रेमी हे सहन करायला तयार असतात. मात्र टॅटू काढल्यानंतर त्या त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी खास टिप्स…

  खपली काढू नका
  टॅटू काढून झाल्यानंतर यावर येणारी खपली काढून टाकावीशी वाटते. मात्र असे केल्याने रंगाची गुणवत्ता कमी होते. किमान पाच आठवडे तरी त्याजागी चोळू किंवा खाजवू नये. यामुळे टॅटू कायमचा अंधुक होण्याची शक्यता असते.

  एसपीएफ असणारे सनस्क्रीम लावा
  सततच्या सूर्य किरणांच्या माऱ्याने अपेक्षेपूर्वीच टॅटूचे रंग फिके पडतात. यामुळे एसपीएफचे प्रमाण जास्त असलेले सनस्क्रीम लावावे.

  त्वचेचा ओलावा टिकवा
  त्वचेतील ओलावा टिकवून ठेवावा. ती खूप कोरडी होणार नाही ना याची काळजी घ्यावी, नाहीतर यामुळे टॅटू बिघडू शकतो. यासाठी नियमितपणे मॉईश्चरायझिंग लावावे.