हटके दिसायचे आहे?; मग ट्राय करा राउंड फॅशन

सध्याच्या ट्रेंडनुसार लूकला मेटॅलिक टच देण्याचा फंडा हिट आहे. यात भर पडली आहे ती ग्रोमेटच्या फॅशनची. जुना, रेट्रो स्टाइलचा हा फॅशन फंडा असला, तरी बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये सध्या ही फॅशन इन आहे. केसांच्या वेगवेगळ्या अॅक्सेसरीजपासून चप्पलांपर्यंत अनेक ठिकाणी हे ग्रोमेट्स दिसून येतायत. साधं पाकिट, स्लिंग बॅग ते ऑफिसच्या विविध बॅग्सना शोभा येण्यासाठी ग्रोमेट लावलेले असतात. तुमचा पेहराव साधा असल्यास त्याला स्टायलिश लूक देण्यासाठी अशा बॅग्ज वापरु शकता.

    दुनिया गोल है असे म्हणतात. हा गोलाकार फॅशनमध्येही दिसून येऊ लागलाय. कपड्यांपासून ते अॅक्सेसरीजपर्यंत गोल आकारांचा वापर करण्यात आलेली ग्रोमेटची फॅशन सध्या जोरावर आहे. आता ग्रोमेट ही काय भानगड आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर छोट्या मेटलच्या रिंग्सना ग्रोमेट असं म्हणतात. मुलांच्या आणि मुलींच्या दोघांसाठीच्या फॅशनमध्ये याचा खूप वापर होताना दिसतोय.

    सध्याच्या ट्रेंडनुसार लूकला मेटॅलिक टच देण्याचा फंडा हिट आहे. यात भर पडली आहे ती ग्रोमेटच्या फॅशनची. जुना, रेट्रो स्टाइलचा हा फॅशन फंडा असला, तरी बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये सध्या ही फॅशन इन आहे. केसांच्या वेगवेगळ्या अॅक्सेसरीजपासून चप्पलांपर्यंत अनेक ठिकाणी हे ग्रोमेट्स दिसून येतायत. साधं पाकिट, स्लिंग बॅग ते ऑफिसच्या विविध बॅग्सना शोभा येण्यासाठी ग्रोमेट लावलेले असतात. तुमचा पेहराव साधा असल्यास त्याला स्टायलिश लूक देण्यासाठी अशा बॅग्ज वापरु शकता. पार्टी गाऊन किंवा साध्या टॉप्सना असे ग्रोमेट लावलेले असतात. ग्रोमेट असलेली जॅकेटस सध्या ट्रेंडमध्ये आहे. असे जॅकेटस तुम्ही फॉर्मल लूक येण्यासाठीही घालू शकता.

    अंगठी, नेकपिस, कानातले यामध्येही अशा अॅक्सेसरीजमध्ये ग्रोमेट दिसतात. एकापेक्षा अधिक ग्रोमेट वापरुन अंगठी बनवली जाते. त्याशिवाय साध्या लेहेंगा, साडीवर ग्रोमेट म्हणजे पारंपरिक लूकला मॉडर्न टच. अशी ही ग्रोमेटची फॅशन बॉलिवूडकरांपासून तरुणाईमध्ये हिट आहे. तसंच कॉलेजमध्ये येऊ घातलेल्या फ्रेशर्स पार्टीसाठी तुम्ही ग्रोमेट फॅशन फॉलो करु शकता.

    कमाल ग्रोमेट नेलआर्टची हॉलिडे नेलआर्टपासून मिरर नेलआर्टचं वेड तरुणींमध्ये दिसून येतंय. नेलआर्ट करताना वेगवेगळ्या डिझाइनचे प्रयोग नेलआर्टमध्ये केले जातात. पारंपरिक सण असो की पार्टी सगळ्यासाठी नेलआर्ट केलं जातं. त्याप्रमाणे ग्रोमेटचं नेलआर्टही ट्रेंडमध्ये आहे. नखांवर किंवा नखांमध्ये टोचून हे ग्रोमेट लावले जातात. मार्केटमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या ग्रोमेट रिंग्ज मिळतात.