मनगटी घड्याळ समोरच्यावर काय छाप पाडते? जाणून घ्या

तसे तर घड्याळाचे काम फक्त वेळ सांगणे आहे पण व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून घड्याळाला महत्वाचे स्थान असल्याचे अभ्यासक मानतात.

  पुरुष असो वा महिला अनेकांना घड्याळ घालण्याची सवय किंवा आवड असते. या विरुद्ध अनेकांना घड्याळ घालायला आवडत नाही. तसे तर घड्याळाचे काम फक्त वेळ सांगणे आहे पण व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून घड्याळाला महत्वाचे स्थान असल्याचे अभ्यासक मानतात. मनगटावरची घड्याळ समोरच्या व्यक्तीवर विशिष्ट छाप पाडत असते. वेळेबाबत तुमची सजगता यातून दिसते, परंतु योग्य प्रकारचे घड्याळ निवडणे फार आवश्यक आहे. असे न केल्यास नकारात्मक छाप  पडण्याची जास्त शक्यता आहे.

  जाणून घेऊया योग्य घड्याळ कशी निवडता येईल?

  पुरुषाला रुबाबदारपणे पोशाख घातलेले पाहिले असेल त्याचसोबतच तुम्हाला त्याच्या मनगटीवरील सुंदर घड्याळ सुद्धा दिसून येईल. घड्याळामुळे तुम्ही चारचौघात उठून तर दिसताच त्यासोबतच एक वेगळेपणाची अनुभूती मिळते. पण तुम्हाला कोणते घड्याळ जास्त शोभून दिसेल हे जाणणे सुद्धा गरेजेचे आहे. खालील सूचना लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला योग्य घड्याळ निवडता येईल.

  कसे खरेदी कराल ?

  घड्याळ खरेदी करताना सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की, कधीही स्वस्त घड्याळ घेवू नका. अशी घड्याळ वापरण्या जोग तर नसतातच त्यासोबत जास्त काळ टिकतही नाहीत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार घड्याळची निवड करू शकता जसे की, स्त्रप (कातड्याचे किंवा धातूचे ) यांत्रिक ( स्वयंचलित किंवा वळण असलेले ) किंवा अल्टिमीटर क्रोनोग्राफ.

  मनगटीनुसार घड्याळ

  केस असलेले मनगट

  ज्या लोकांच्या हातावर केस आहेत त्यांनी धातूचे घड्याळ वापरणे टाळावे. अशी घड्याळ तुमच्या हातांवरील केस खेचतात आणि तुम्हाला असा अनुभव लोकांसमोर झालेला आवडणार नाही. सुरक्षिततेसाठी आणि शैलीदारसाठी कातडे असलेले घड्याळ निवडा.

  मोठे मनगट

  जर तुमचा हात मोठा किंवा जाड असेल तर असे घड्याळ निवडू नका जे तुमच्या हातावर उठून दिसणार नाही. अशा घड्याळची निवड करा ज्याची व्यासाची ५० मिलीमीटर इतकी लांबी असेल.

  बारीक मनगट

  बारीक हात असलेल्या लोकांना मोठ्या घड्याळ्याची निवड करा जे लहान आणि मनगटीवर बरोबर बसेल.