fashion

वर्ल्ड फॅशन डे(World Fashion Day) च्या निमित्ताने आणि रविवारी असलेल्या रक्षाबंधनाच्या(Rakshabandhan 2021) निमित्ताने आपण या सणाच्या दिवशी कशी फॅशन(Festival Fashion) करु शकतो हे पाहुयात.

  दरवर्षी २१ ऑगस्टला वर्ल्ड फॅशन डे (World Fashion Day 2021)साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश फॅशनच्या बाबतीत लोकांना जागरुक करणे हा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये फॅशन जगतामुळे अनेक गोष्टींची जाणीव लोकांना झाली. एका विशिष्ट प्रकारे कपडे घालून स्वत: तयार होणे ही खूप वेळ लागणारी प्रक्रिया आहे.कलेच्या एका रुपाला समोर आणणे आणि ते मांडणे ही खूप वेगळा अनुभव देणारी गोष्ट आहे. वर्ल्ड फॅशन डे च्या निमित्ताने आणि रविवारी असलेल्या रक्षाबंधनाच्या(Rakshabandhan 2021) निमित्ताने आपण या सणाच्या दिवशी कशी फॅशन(Festival Fashion) करु शकतो हे पाहुयात.

  • जर तुम्ही इंडो वेस्टर्न लूक करु इच्छित असाल तर प्लाझो पॅन्ट आणि क्रॉप टॉप असा पेहराव करु शकता. हे कॉम्बिनेशन खूप छान दिसते. फक्त तुमच्या स्किन टोननुसार कपड्यांचा रंग निवडा. प्लाझो पॅन्ट आणि क्रॉप टॉपसोबत श्रग चांगले दिसत असेल तर तेही वापरा.
  • प्लेन ब्लॅक किंवा व्हाईट सूटसोबत हेवी दुपट्टा असा लूकही छान दिसतो. हे कॉम्बिनेशन सगळ्यांनाच छान दिसते. यामुळे एक वेगळा लूक मिळतो आणि तुम्ही स्टायलिशही दिसता.
  • सगळ्यांच्या कपाटात पार्टी वेअर ड्रेस असतो. एथनिक लूकसाठी या पार्टी वेअरला मिक्स आणि मॅच करुन वापरू शकता. असे केल्याने तुम्ही एकच ड्रेस वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता. हेवी स्कर्टसोबत सिल्क कुर्ता किंवा ब्रालेट टॉप घाला. यासोबत मॅचिंग दुपट्टा वापरू शकता.
  • मॅक्सी ड्रेस हासुद्धा एक उत्तम पर्याय आहे. या ड्रेससोबत गाऊन पॅटर्न घालू शकता.

  तुम्हाला कोणत्या प्रकारे फॅशन करायला आवडते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हा सगळ्यांना वर्ल्ड फॅशन डेच्या शुभेच्छा.