चुकीच्या ड्रेसिंग सेन्समुळे पडते नकारात्मक छाप; ड्रेसमधील ‘या’ चुका टाळा

योग्य ड्रेसची निवड करण्यात तुमची चूक झाली आहे. अशावेळी तुमचे संपूर्ण लक्ष स्वतःवरच केंद्रीत होते आणि..

  तुम्ही एखाद्या पार्टीत आहात आणि तुम्हाला परिधान केलेल्या कपड्यांमध्ये खूप अवघडल्यासारखे वाटत आहे. तर समजा की, पार्टीसाठी योग्य ड्रेसची निवड करण्यात तुमची चूक झाली आहे (Wrong dressing sense). अशावेळी तुमचे संपूर्ण लक्ष स्वतःवरच केंद्रीत होते आणि पार्टीचा मनसोक्त आनंद घेता येत नाही. यामुळे पार्टीसाठी अशी करा ड्रेसची निवड….

  – रात्री उशिरा नाईटआऊट करण्याचा तुमचा प्लॅन असेल तर हाय हिल्स अजिबात वापरू नका. कारण अशावेळी खूप चालणे होते. यामुळे फ्लॅट चप्पलचा पर्याय चांगला आहे.

  – लांब आणि मोठा ड्रेस वापरू नका. पार्टीदरम्यान तो कोठेतरी अडकून खराब होण्याची किंवा कोणी पाय देऊन तो घाण करण्याची शक्यता असते. यामुळे तुम्ही बॉडी हँगिंग गाऊन घालू शकता, जो की तुम्हाला ग्लॅमरस लुक देईल.

  – घट्ट कपडे परिधान करू नका. सैलसर आणि फॅशनेबल कपडे घाला. घट्ट ड्रेस घातल्याने तुम्हाला श्वास घेण्यात आणि चालण्यातही त्रास होईल.

  – डेनिम आणि टॉपही तुम्हाला रिच पार्टी लुक देतात.

  – तुमच्या आउटफिटवर सुट होणारी अशी लहान पर्स निवडा. मोठी वजनदार पर्स घेऊ नका. पार्टीदरम्यान सांभाळायला ती खूप त्रासदायक होते.