जगणं शिकवणारी जीवनशैली

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या ऐतिहासिक लॉकडाऊनला एक वर्ष पूर्ण झाले आहे. आता या दुष्टचक्रातून देशव नागरिक मुक्‍त होऊ 'शकलेले नाहीत. उलटपक्षी मागच्या महिन्यापासून महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांना दुसऱया लाटेचा तडाखा बसू लागल्याचे दिसत आहे. हे पाहता कोविडचे आव्हान अद्यापही कायम आहे, हे नक्की

    अर्थात हा चक्रव्यूह भेदण्यासाठी सर्व नियमांच्या पालनाबरोबरच लसीकरणाचा कार्यक्रमही आपल्याला यशस्वीरीत्या तडीस न्यावा लागेल. चीनमधील वुहान प्रांतातून चंचूप्रवेश केलेल्या या विषाणूने बघता बघता साऱ्या जगभर हातपाय पसरले. आत्तापर्यंत या महामारीने जवळपास २७ लाखांहून अधिक जणांना बळी घेतला आहे. आता पुन्हा मृत्यूदर वाढू लागल्याने नागरिकांना भीतीच्या सावटाखालीच वावरावे लागते आहे.

    २४ मार्चला जाहीर झालेला लॉकडाऊन, त्यानंतर त्याची पुन्हा वाढविण्यात आलेली मुदत, कोरोनाच्या तीव्र लाटेत लाखमोलाच्या माणसांना गमवावा लागलेला जीव हा टप्पा ‘सगळय़ांसाठीच अत्यंत कठीण परीक्षेचा होता. या कालखंडात अनेकांना आपल्या नोकऱया गमवाव्या लागल्या. कित्येकांचे धंदे बसले. अर्थचक्रावरच आघात झाल्याने क्रयशक्‍्तीच घटली.

    अनलॉक प्रक्रिया व लाटेचा प्रभाव ओसरल्यानंतर सर्व काही सुरळीत वा यथास्थित होण्याच्या आशा बळावत असतानाच या विषाणूने नवनव्या रूपात डोके वर काढल्याने पुन्हा चिंतेचे गडद ढग दाटलेले दिसतात. महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश यासारख्या राज्यात बाधितांचा आकडा रोज वाढतोच आहे. देशात मागच्या दोन दिवसात ९० ते ९१ हजारांपर्यंत रुग्णांची नोंद होणे ब एका दिवसात २०० हून अधिक जणांचा मृत्यू होणे, यातूनच साथीची तीत्रता वाढल्याचे दिसून येते.

    पुणे, मुंबई, नागपूर या महानगरातही दररोज अडीच ते तीन हजारांवर रुग्णांची नोंद होत असून, बेडअभावी रुग्ण व नातेवाईकांचे हाळ होत असल्याचे चित्र आहे. ‘कोविड महामारीत मागच्या वर्षभरात उपचाराअभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे सरकारने या आघाडीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट कायम असले, तरी त्याविषयीची भीती बऱयाच अंशी दूर झाल्याने अनेक महाभाग सर्व नियम पायदळी तुडवत विनामास्क बिनधास्तपणे फिरत असतात.

    ही सारी बेफिकिरीच याच्या मुळाशी आहे, अस निश्चितपणे म्हणता येईल. नागरिकांन प्रतिबंधात्मक नियमांचे पाळन करावे लागेल अन्यथा, लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्यार राहणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांन म्हटले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीर्ह निर्वाणीचा इशारा दिला आहे. खरे तर संपूण लॉकडाऊन आज कुणालाच परवडणारे नाही पेट्रोळ, डिझेल, एलपीजी, खाद्यतेलांच्य दरातील भरमसाठ वाढीसह महागाईच्य भडक्याने आजमितीला सर्वसामान्य माणसाच जगणे कठीण बनले आहे. त्यात वैद्यकीच खर्चातही मोठी वाढ झाली आहे.

    रोजच्या खर्चाची तोंडमिळविणी करताना मेटाकुटील आलेल्या नागरिकांच्या रोजगार वा छोट्य मोठ्या व्यवसायावरच गदा येत असेल, त्याने करायचे काय, याचे उत्तर कुणाकडेच् नाही. म्हणूनच प्रत्येकाने कोरोनाविषयव नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास प्राधान्र द्यावे. महाराष्ट्रात सुशांतसिंह राजपूत प्रकरण शांत झाल्यानंतत आता मनसुख हिरे मृत्यूप्रवकरण॒ व परमबीरसिंह यांच्य लेटरबॉम्बचे प्रकरण गाजते आहे. प्रशासनावः पकड नसलेले सरकार नि केवळ वादप्रस मुद्दयांवर भर देणारे विरोधक अशा या दोघांच्य मारामारीत महामारीचे कुणालाच पडलेल नाही, अशीच आजघडीची स्थिती आहे.