congress rahul gandhi

वरिष्ठ नेत्यांबाबत सन्मान सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या २३ काँग्रेस नेत्यांपैकी २० नेते या बैठकीमध्ये उपस्थित होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आता पक्षाला गरज नाही, असे भासविण्यात येत होते, परंतु सोनिया आणि राहुल गांधी यांनी पक्षनेत्यांना असे आश्‍वासन दिले की, असे काहीही घडणार नाही.

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांच्या प्रयत्नामुळे कॉँग्रेसच्या ५ असंतुष्ट नेत्यांची पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत चार तास चर्चा झाली. पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल करण्यात यावे अशी मागणी करणारे पत्र पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिणारे नेते या चर्चेत सहभागी झाले होते. तथापि कपिल सिब्बल मात्र यावेळी अनुपस्थित होते. गुलाम नबी आझाद यांच्यासह २० नेत्यांनी पक्षाला मजबूत करण्यासाठी आपापली मते यावेळी मांडली. कॉँग्रेस श्रेष्ठींनी सलोख्याचे धोरण स्वीकारले. यापुढे राहुल गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, असे यावेळी ठरविण्यात आले. सोनिया आणि राहुल यांच्या टीममध्ये समन्वय असावा असेही मत व्यक्‍त करण्यात आले.

वरिष्ठ नेत्यांबाबत सन्मान सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या २३ काँग्रेस नेत्यांपैकी २० नेते या बैठकीमध्ये उपस्थित होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आता पक्षाला गरज नाही, असे भासविण्यात येत होते, परंतु सोनिया आणि राहुल गांधी यांनी पक्षनेत्यांना असे आश्‍वासन दिले की, असे काहीही घडणार नाही. सर्व नेत्यांचे योगदान आणि त्यांच्या सूचना विचारात घेतल्या जातील. राहुल गांधी म्हणाले की, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि भूपेंदरसिंह हुड्डा हे वरिष्ठ नेते आपले वडील राजीव गांधी यांचे मित्र आहेत, त्यांनी काँग्रेसला बळकट करण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. राहुल गांधी यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा सन्मान राखला जाईल, असे या बैठकीत आश्‍वासन दिले. गांधी परिवाराशिवाय काँग्रेस राहूच शकणार नाही. हा परिवारच काँग्रेसला एकजूट ठेवू शकतो, असे मतही यावेळी व्यक्‍त करण्यात आले.

क्षमताबाबत संशय

पक्षाचा अध्यक्ष नियुक्‍त करण्याऐवजी पक्षांतर्गत निवडणुका घेऊन पक्षाध्यक्ष निवडण्यात यावा, अशी इच्छा राहुल गांधी यांनी जाहीर केली. तथापि, पक्षहित लक्षात घेऊन राहुल गांधी यांनीच पक्षाचे पूर्णवेळ नेतृत्व करावे. त्यांनी वेळोवेळी सुट्यांवर जाऊ नये. संसदेचे अधिवेशन सुरू असतानाही अनेक वेळा राहुल गांधी दिल्लीबाहेर होते. कॉँग्रेस मजबूत राहिली तर युपीएसुद्धा मजबूत होईल. मायावती आणि चंद्राबाबू सोनिया गांधी यांच्यासोबत संवाद साधतात, परंतु राहुल गांधी यांना मात्र ते ज्युनिअर समजून त्यांच्या नेतृत्वक्षमतेवर विश्‍वास ठेवित नाही. भाजपा नेते गांधींवर नेहमीच आरोप-प्रत्यारोप असतात. परंतु राहुल गांधी यांच्यामध्ये मोदींचा सामना करण्याचे सामर्थ्य आहे. राहुलपेक्षा कमी वयाचे असतानाही जॉन केनडी आणि क्लिंटन यांनी अमेरिकेला नेतृत्व दिले होते.

तरुण आणि बुजुर्गांमध्ये ताळमेळ हवा

आगामी काही महिन्यात काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल आणि राहुल गांधी हेच काँग्रेसची कमान सांभाळतील, म्हणूनच ज्येष्ठ आणि युवकांमध्ये पक्षांतर्गत ताळमेळ ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपाने मात्र कोणत्या राज्यात काँग्रेसला कमजोर करता येईल, याचा सर्व्हे केला असून त्या राज्यांमध्ये काँग्रेसला कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना भाजपा पक्षामध्ये दाखल करून घेत आहे, यावरसुद्धा लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. अनेक बुजुर्ग नेत्यांची अजूनही काँग्रेसला गरज आहे. वरिष्ठ काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांच्यामध्ये असलेला तणाव दूर करण्याची नितांत आवश्यकता आहे. राहुल गांधी यांना युवकांना पक्षामध्ये संधी मिळावी, असे वाटत असते तर सोनिया गांधी यांचा मात्र अनुभवी आणि जुन्या वरिष्ठ नेत्यांवरच विश्‍वास आहे. या बैठकीमध्ये शेतकरी आंदोलन, देशाची अर्थव्यवस्था आणि काश्मीरसंबंधी मुद्दयावरही चर्चा झाली.